

Morbe dam death
खालापूर : अनिकेत भगत (वय 20) रा. सुकापूर भगत वाडी पनवेल या महाविद्यालयीन विद्यार्थ्याचा खालापुरातील मोरबे धरणात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
रसायनी येथील पिल्लई कॉलेजात इंजिनियरिंग च्या तिसऱ्या वर्षात अनिकेत किसन भगत शिकत होता. बुधवार दि.30 रोजी परीक्षा संपल्यावर आणि उद्या पासून सुट्टी असल्याने मित्रांसोबत नवी मुंबई महानगर पालिका यांना पाणी पुरवठा करणाऱ्या मोरबे धरणाच्या परिसरात आला. सर्व मित्र पाण्याबाहेर असताना पोहण्यासाठी तो पाण्यात उतरला, काही अंतर गेल्यावर त्याची दमछाख झाली आणि त्यातच तो बुडाला.
त्याच्या मित्रांनी ही माहिती स्थानिकांना दिल्यावर खालापूर पोलीस निरीक्षक सचिन पवार हे उप पोलीस निरीक्षक विशाल पवार यांच्यासह दाखल झाले, हेल्प फाऊंडेशन प्रमुख गुरुनाथ साठेलकर आपल्या टीम सह दाखल झाले. दीड तास पोहून आणि बोटीने पाण्यात तपास केल्यावर सायंकाळी ५.४५ वाजता त्याचा मृतदेह सापडला.