रायगड: कामोठे येथे अत्याचारातून अल्पवयीन मुलगी गर्भवती

रायगड: कामोठे येथे अत्याचारातून अल्पवयीन मुलगी गर्भवती

पनवेल: पुढारी वृत्तसेवा: कामोठेतील एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलाने इन्स्टाग्रामवरून मैत्री झालेल्या १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे या घटनेतील पीडित मुलगी आठ महिन्यांची गर्भवती राहिली आहे.
कामोठे पोलिसांनी या प्रकरणात पीडित मुलीच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीवरून अल्पवयीन मुलगा व त्याच्या आईविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

या घटनेतील अल्पवयीन मुलगा कामोठेत राहत असून तो बारावीत आहे. तर पीडित मुलगी तुर्भे येथे राहण्यास असून ती शाळेत शिकते. वर्षभरापूर्वी दोघांमध्ये इन्स्टाग्रामवरून ओळख झाली होती. त्यांच्यात मैत्री होऊन प्रेमसंबंध निर्माण झाले. दोघांचे एकमेकांच्या घरी येणे-जाणे होते.

यादरम्यान अल्पवयीन मुलाने पीडित मुलगी आपल्या घरी आली असताना तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. पीडित मुलगी गरोदर राहिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. नंतर पीडितेच्या पालकांनी कामोठे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार व पोक्सो कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणातील मुलाच्या आईला या संपूर्ण प्रकरणाची माहिती असताना तिने कधीही आपल्या मुलाला विरोध केला नाही. त्यामुळे आईलाही या गुन्ह्यात सहआरोपी करण्यात आले आहे.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news