रायगड : सारीपाट खेळण्याची अनेक वर्षांची पंरपरा पनवेलमध्ये कायम!

रायगड : सारीपाट खेळण्याची अनेक वर्षांची पंरपरा पनवेलमध्ये कायम!

 पनवेल शहरातील लाईन आळीतील श्री हनुमान मंदिरात विश्वस्त कै.दशरथशेठ धोंडु कुरघोडे यांनी सुमारे ७०-८० वर्षांपूर्वी सुरु केलेला सारीपाटाच्या खेळाची प्रथा त्यांच्या तिसऱ्या पिढीनेही पुढे अबाधित ठेवली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री हनुमान मंदिरात दर सोमवारी, गुरुवारी व श्री कृष्ण जन्माष्टमीला सारीपाटाचा डाव मांडला जात आहे.

महाभारत काळापासून खेळला जाणारा सारीपाटाचा हा खेळ आजही ग्रामीण भागात जपला जात आहे. आपले ग्रामीणपण सोडत शहराकडे वाटचाल केलेल्या पनवेल शहरात लाईन आळीतील श्री हनुमान मंदिरात विश्वस्त कै. दशरथशेठ धोंडु कुरघोडे यांनी सुमारे ७०-८० वर्षांपूर्वी सुरु केला होता. देशस्थ मराठा मंडळ ट्रस्टच्या श्री हनुमान मंदिरात फार पूर्वीपासून पनवेलवासी सारीपाट हा खेळ श्रावण महिन्यात दर सोमवार, गुरुवारी व श्री कृष्ण जन्माष्टमीच्या सप्ताहात रोज खेळला जात आहे. त्या काळात पंचक्रोशितील शेकडो लोक हा खेळ खेळण्यासाठी यायची. कै दशरथशेठ धोंडु कुरघोडे यांच्या निधना नंतर सारीपाट खेळ त्यांचे चिरंजीव श्री हनुमान मंदिर पनवेलवासी समस्त देशस्थ मराठा मंडळ ट्रस्टचे मा.अध्यक्ष व माजी नगरसेवक स्व. लक्ष्मणशेठ दशरथशेठ कुरघोडे यांनी सुरु ठेवला. आज त्यांच्या निधनानंतर कुरघोडे कुटुंबाची तिसरी पिढी ट्रस्टचे सचिव कुणाल लक्ष्मण कुरघोडे व सदस्य कपिल भरत कुरघोडे यांनी आपली हि परंपरा जपत पुढे घेऊन जाण्याचे ध्येय जपले आहे.

हेही वाचलंत का?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news