Raigad Crime | रायगडमध्ये खळबळ ! कौटुंबिक वादातून विष प्राशन: आईसह 2 चिमुकल्यांचा मृत्यू; दोन मुलांवर उपचार सुरू

माणगाव तालुक्यातील खरवली आदिवासीवाडीतील धक्कादायक घटना
Mangaon Poisoning Case Mother Children Death
Mangaon Poisoning Case Mother Children DeathPudhari
Published on
Updated on

Mangaon Poisoning Case Mother Children Death

माणगाव : माणगाव तालुक्यातील खरवली आदिवासी वाडी येथे शनिवारी सकाळी घडलेल्या एका दुर्दैवी घटनेने संपूर्ण तालुका हादरून गेला आहे. कौटुंबिक वादातून आलेल्या नैराश्यातून एका ३३ वर्षीय विवाहित महिलेने स्वतः विष प्राशन करत आपल्या चार मुलांनाही विषारी पेय पाजल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेत आईसह दोन मुलींचा मृत्यू झाला असून एक मुलगा व एक मुलगी यांच्यावर गंभीर अवस्थेत माणगाव उपजिल्हा रुग्णालयात पुढील उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार, खरवली आदिवासी वाडी येथील आशा धर्मा जाधव (वय ३३) यांनी शनिवारी (दि. १३) सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास थंड पेयामध्ये कोणते तरी मासे मारण्यासाठी वापरले जाणारे विषारी औषध मिसळून ते स्वतः प्राशन केले. त्यानंतर त्यांनी आपल्या चार मुलांना देखील तेच पेय दिल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेत आशा जाधव यांच्यासह दुर्वा जाधव (वय ७) आणि नंदिनी जाधव (वय ४) यांचा मृत्यू झाला. तर रवी जाधव (वय ८) आणि राजश्री जाधव (वय ४) या दोघांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर माणगाव उपजिल्हा रुग्णालय येथे पुढील उपचार सुरू आहेत.

Mangaon Poisoning Case Mother Children Death
Raigad Crime : नेरळ साईनाका येथे वृद्धाची फसवणूक; २ लाखांची रोख रक्कम लांबवली

या घटनेची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली. स्थानिक नागरिकांनी तत्काळ सर्वांना उपचारासाठी माणगाव उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथे बालरोग व नवजात शिशु तज्ज्ञ डॉ. आबासाहेब पाटणकर यांनी मुलांची तपासणी करून त्यांच्यावर प्राथमिक उपचार केले. मुलांची प्रकृती गंभीर असल्याने अधिक उपचारासाठी त्यांना मुंबईकडे रवाना करण्याचा सल्ला देण्यात आला.

प्राथमिक तपासात ही घटना कौटुंबिक वादातून निर्माण झालेल्या मानसिक तणाव व नैराश्यामुळे घडली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र नेमके कारण काय होते, याचा तपास पोलीस करीत आहेत. तसेच थंड पेया मध्ये मिसळण्यात आलेले विषारी द्रव्य नेमके कोणते होते, याबाबतही अधिकृत अहवालाची प्रतीक्षा आहे.

Mangaon Poisoning Case Mother Children Death
Raigad Crime : मातीच्या ढिगाऱ्यात मानवी कवटी

दरम्यान, या प्रकरणी माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती. माणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक या संपूर्ण घटनेचा सखोल तपास करीत असून विविध अंगांनी चौकशी सुरू आहे. या अत्यंत वेदनादायी घटनेमुळे खरवली परिसरासह संपूर्ण माणगाव तालुक्यात शोककळा पसरली असून आईसह दोन निष्पाप चिमुकल्यांचा झालेला मृत्यू नागरिकांना हेलावून टाकणारा ठरला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news