Konkan tourism projects : पर्यटन वाढीचे प्रकल्प राहिले कागदावरच

वरसोलीतील बीच रॉक्स प्रकल्पही निधीअभावी रखडला, पर्यटकही नाराज
Konkan tourism projects
पर्यटन वाढीचे प्रकल्प राहिले कागदावरचpudhari photo
Published on
Updated on

अलिबाग : रायगडसह कोकणातील पर्यटनवाढीसाठी विद्यमान सरकारने अनेक योजना जाहीर केल्या आहेत. प्रत्यक्षात पर्यटनवाढीचे हे प्रकल्प कागदावरच असून, त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी न झाल्याने अनेक प्रकल्पांची पूर्तताच करता आलेली नाही. त्यातील एक समुद्र कुटी (बीच रॉक्स) हा निधीअभावी थांबला आहे. आता निवडणुकीचा हंगाम झाल्याने पर्यटनविकासाच्या वल्गना करणाऱ्यांना हे प्रकल्प का रखडले याचा खुलासा करावा लागणार आहे.

रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील वरसोली आणि श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर समुद्रकिनारी समुद्र कुटी (बीच शॅक्स) प्रकल्प राबवण्यात येणार आहे. हा प्रकल्प पूर्णत्वास आल्यास येथील पर्यटन वाढीसोबत स्थानिकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. विशेष म्हणजे वरसोली आणि दिवेआगर ग्रामपंचायतीने या प्रकल्पासाठी एमटीडीसीला सहकार्य केले आहे. मात्र, पर्यावरण विभागाच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत अडकल्याने बीच शॅक्स प्रकल्प अधांतरी राहिला आहे.

Konkan tourism projects
Raigad News : बदलत्या हवामानाने म्हावराच झालायं गायब

रायगड जिल्हा पर्यटन दृष्ट्या महत्त्वपूर्ण जिल्हा आहे. येथील समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांची रिघ लागलेली असते. म्हणूनच जिल्ह्यातील पर्यटनाला आणखी चालना मिळावी यासाठी पर्यटन विभागाच्या माध्यमातून रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर या जिल्ह्यांमध्ये गोव्याच्या धर्तीवर समुद्र कुटी संकल्पना राबवण्याचा निर्णय सरकारने जून २०२० मध्ये घेतला. त्यानुसार रायगड जिल्ह्यात अलिबाग तालुक्यातील वरसोली तर श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगार या दोन समुद्रकिनारी प्रकल्प तयार करण्यास सरकारने मंजुरी दिली.

या प्रकल्पांमुळे पर्यटनास चालना मिळून स्थानिकांना रोजगार संधी आणि आर्थिक स्तर उंचावणार होता. त्यामुळे वरसोली ग्रामपंचायत व दिवेआगार ग्रामपंचायतीने गावाच्या विकासाच्या दृष्टीने आणि पर्यटन वाढीसाठी प्रकल्पाला सर्वतोपरी मदत करीत एमटीडीसीला जागा उपलब्ध करून दिली आहे. तसेच सरकारने दोन्ही प्रकल्पांसाठी सल्लागार नियुक्त केले आहेत. मात्र प्रकल्पाचे काम सुरू झालेले नाही.

समुद्र कुटी प्रकल्प हा समुद्रकिनारी होणार आहे. त्यामुळे त्याला पर्यावरण विभागाची मंजुरीही आवश्यक आहे. तसेच काही ठिकाणी वन विभाग असल्याने त्यांचीही परवानगी आवश्यक आहे. या विभागांकडून अजून परवानगी मिळालेली नाही. बांधकाम समुद्रकिनारी असल्याने ते नैसर्गिक आपत्ती काळात हलवणे सोयीस्कर असणेही महत्त्वाचे आहे. त्या अनुषंगाने योजना करून हा प्रकल्प उभारला जाणार आहे.

Konkan tourism projects
Neral bonded labor case : नेरळमध्ये वेठबिगारीचा कळस; मानवतेला काळिमा

या प्रकल्पाचा सर्वे प्लान देण्याची जबाबदारी सल्लागारांवर आहे. वरस-ोली येथे ग्रामपंचायत पूर्ण मदत करत असूनही दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे एमटीडीसी आणि सल्लागार कंपनीत समन्वय नसल्याने समुद्र कुटी प्रकल्पाला जागा उपलब्ध असूनही प्रकल्प कागदावरच आहे. त्यामुळे पर्यटन वाढीसाठी प्रकल्प करण्याचा हेतू अद्याप विभागाच्या आणि पर्यावरण विभागाच्या मंजुरीसाठी असफल राहिला आहे.

पर्यटन कुटीची संकल्पना

गोवा राज्य समुद्रकिनारी वाळूत खुर्चीवर बसून लाटांचा आणि खाद्यपदार्थांचा आनंद घेता येतो. वरसोली आणि दिवेआगार समुद्रकिनारी १५ बाय १५ फूट आणि २० बाय १५ आकाराच्या १० कुटी पर्यटकांसाठी बांधण्यात येणार आहे. या ठिकाणी सीसीटीव्ही लावले जाणार असून सकाळी ७ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत पर्यटकांना याचा वापर करता येणार आहे.

कुटी मिळणाऱ्या व्यक्तींकरिता परवानगीसाठी १५ हजार रुपये अर्जासोबत ना परतावा मूल्य असेल. तसेच या कुटीसाठी पहिल्या वर्षी ४५ हजार, दुसऱ्या वर्षी ५० हजार, तिसऱ्या वर्षी ५५ हजार वार्षिक शुल्क राहील. याशिवाय ३० हजार रुपये सुरक्षा अमानत जमा करावे लागेल. तीन वर्षांचा कालावधी संपल्यानंतर अनामत परत केली जाईल. चौपाटी कुटी चालवण्यासंदर्भात पर्यटन विभागाने विविध नियम घालून दिले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news