Kharif Crop Damage: रायगडमध्ये खरीप पिकांचे मोठे नुकसान; पाच तालुक्यांतील २१ हजार शेतकरी बाधित

६६४ गावांतील १० हजार ४८९ हेक्टर क्षेत्र बाधित; ८ कोटी ९४ लाखांच्या निधीचा प्रस्ताव शासनाकडे
Kharif Crop Damage
Kharif Crop DamageFile Photo
Published on: 
Updated on: 

सुवर्णा दिवेकर

अलिबाग: रायगड जिल्ह्यातील खरीप हंगामात दुष्काळजन्य परिस्थितीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले असून, ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेल्या पाच तालुक्यांतील २१ हजार ४८९ शेतकऱ्यांना या संकटाचा फटका बसला आहे.

श्रीवर्धन, पेण, कर्जत, तळा आणि महाड या पाच तालुक्यांतील एकूण ६६४ गावांमधील १० हजार ४८९.२१ हेक्टर बाधित क्षेत्राची नोंद करण्यात आली आहे. या नुकसानीपोटी ८ कोटी ९४ लाख ४० हजार रुपयांच्या अपेक्षित निधीचा अहवाल शासनाकडे सादर करण्यात आला आहे.

Kharif Crop Damage
Mumbai Pune Expressway Accident: मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर खोपोलीजवळ अर्ध्या तासात दोन अपघात; ट्रेलर चालकाचा मृत्यू

यंदाच्या खरीप हंगामात पावसाच्या अनियमिततेमुळे रायगड जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली. यापूर्वी श्रीवर्धन तालुक्याचा दुष्काळाच्या यादीत समावेश झाला होता. या तालुक्यातील पंचनामे पूर्ण करण्यात आले होते.

त्यानंतर महाड, पेण, कर्जत आणि तळा या तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिती लक्षात घेऊन ग्राउंड ट्रुथिंग करण्यासह प्रत्यक्ष पीक नुकसानीचे पंचनामे करून अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.

त्यानुसार ही प्रक्रिया पूर्ण झाली असून, संबंधित अहवाल आज शासनाकडे पाठविण्यात येणार असल्‍याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी वंदना शिंदे यांनी दिली.

प्रशासनाने सादर केलेल्या आकडेवारीनुसार, कर्जत तालुक्यात सर्वाधिक नुकसान झाले आहे. या तालुक्यातील २०० गावांमधील ८ हजार २२९ शेतकऱ्यांचे ४ हजार ६३९.२२ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे.

महाड तालुक्यात १८३ गावांतील ७ हजार १२७ शेतकऱ्यांचे ३ हजार ४९६.३० हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. पेण तालुक्यात १४४ गावांतील ३ हजार ६८१ शेतकऱ्यांचे १ हजार ५४८.१० हेक्टर, तर तळा तालुक्यात ६९ गावांतील १ हजार ७१ शेतकऱ्यांचे ३४०.३३ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. श्रीवर्धन तालुक्यात ६८ गावांतील १ हजार ३८१ शेतकऱ्यांचे ४६५.२६ हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याची नोंद आहे.

Kharif Crop Damage
Karanja Port: उरणच्या करंजा बंदरात हजारो तारली माशांच्या समुद्राबाहेर उड्या; नागरिकांची गर्दी

या पाच तालुक्यांतील नुकसानीचे अहवाल शासनाकडे पाठविण्याची प्रक्रिया सुरू असतानाच आता म्हसळा, रोहा आणि माणगाव या आणखी तीन तालुक्यांमध्येही दुष्काळसदृश्य परिस्थितीच्या अनुषंगाने ग्राउंड ट्रुथिंग आणि पीक नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना प्राप्त झाल्या आहेत. यासंदर्भातील पत्र दोन दिवसांपूर्वी प्राप्त झाले असून, त्यानुसार संबंधित तालुक्यांच्या तहसीलदारांना पंचनामे करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

आता रायगड जिल्ह्यातील आणखी तीन तालुक्यांतील शेतकऱ्यांच्या नुकसानीचे चित्र स्पष्ट होणार असून, या पंचनाम्यांच्या अहवालानंतर शासनाकडून पुढील निर्णयाकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. दरम्‍यान संपूर्ण जिल्‍हा दुष्‍काळग्रस्‍त जाहीर करावा यासाठी स्‍थानिक लोक प्रतिनिधींकडून शासनदरबारी पाठपुरावा सुरू आहे.

प्रत्यक्ष पीक नुकसानीचे पंचनामे करा

यंदाच्या खरीप हंगामात पावसाच्या अनियमिततेमुळे रायगड जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली. यापूर्वी श्रीवर्धन तालुक्याचा दुष्काळाच्या यादीत समावेश झाला होता.

या तालुक्यातील पंचनामे पूर्ण करण्यात आले होते. त्यानंतर महाड, पेण, कर्जत आणि तळा या तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिती लक्षात घेऊन ग्राउंड ट्रुथिंग करण्यासह प्रत्यक्ष पीक नुकसानीचे पंचनामे करून अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.