Monsoon Impact On Roads
नेरळ : मुसळधार पडलेल्या पावसामुळे कर्जत तालुक्यातील बोंडे शेत या मुख्य रस्त्यावर ठिकठिकाणी मोठी भगदाड पडली असल्याने येथील नागरिकांना नाहाक 15 ते 20 किलो मीटरच्या मोठ्या वाहनांसाठीच्या वाहतूक प्रवास करीताचा त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासन या संदर्भात दखल घेणार का? असा प्रश्न मात्र नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
बोंडे शेत ते बोरगाव हा तीन किलो मिटरचा रस्ता असून हा रस्ता नदीकाठ व डोंगर भागातून जात असल्याने 25 मे रोजी पडलेल्या मुसळधार पावसामुळे बोंडे शेत या रस्त्यावरील असलेल्या पुलाजवळील भाग हा खचून मोठ भगदाड पडले आहे. बोरगाव बोंडे शेत, पेंढारी, भोपळी चेवणे या गावांकडे जाणारा मुख्य ग्रामीण रस्ता असल्याने या रस्त्यावरून मात्र दुचाकी व पायी प्रवास करणे शक्य असून मोठया वाहनांसाठी हा रस्ता पडलेल्या भगदाडामुळे प्रवास शक्य नसल्याने व धोकादायक ठरत असल्याने मोठया वाहनासाठीचा प्रवास करणे बंद करण्याची वेळ आली आहे.
त्यामुळे या रस्त्यावरून येथील नागरिकांना रूग्णांना दवाखाण्यात नेणे व मालवाहतूक करण्यासाठी ओलमण, भोपळी, चई, चेवणे व म्हसा असा साधारण 15 ते 20 किलो मीटरचा नाहक प्रवास करण्याची वेळ आली आहे. मात्र आठवडा होऊन सुध्दा या रस्त्यावरील पडलेल्या भगदाडाची पाहणी व दुरुस्ती करीता प्रशासन स्तरावरू कोणतीही दखल घेतली जात नसल्याने व नागरिकांना 15 ते 20 किलो मीटरचा नाहक प्रवासाचा त्रास सहन करावा लागत असल्याने, मात्र येथील नागरिकांकडून प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला जात असून, या पडलेल्या भगदाडाची दुरुस्ती करण्याची दखल ही प्रशासन घेणार का? असा प्रश्न देखील नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.