

अलिबाग : रमेश कांबळे
रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात रोज हजारो रुग्णांवर विविध उपचार केले जात असतानाच रुग्णालयात येणार्या रुग्णासाठी पिण्यासाठी असलेल्या पाण्याच्या कुलरमध्ये किडे, माती मिश्रित पाणी असल्याने रुग्णांना त्यापाण्यामुळे विविध प्रकारच्या साथीचे रोग उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही.
अलिबाग येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात बाह्य रुग्ण विभागात तसेच आंतर रुग्ण कक्षात येणार्या रुग्ण आणि नातेवाईक यांच्या साठी पाण्याची व्यवस्था व्हावी यासाठी तळ मजल्यापासून प्रत्येक मजल्यावर पाण्याचे कुलर बसविण्यात आले आहेत. मात्र या कुलरची देखभाल करणे ही निंतात गरजेचे आहे. मात्र कुलरची अवस्था पाहता असता त्याची देखभाल होत नसावी अशी शंका उपस्थित होत आहे.
जिल्हा सामान्य रुग्णालयात असणार्या कुलरच्या झाकणावर मातीचा थर तसेच कुलर मध्ये माती तसेच लहान लहान किडे पाण्यात दिसून आले आहे. कुलर लां जोडलेले पाण्याचे फिल्टर देखील पूर्णपणे मातीने भरलेल्या अवस्थेत तसेच कुलरच्या बाजूला देखील काही प्रमाणात कचरा असल्याचे दिसून आले आहे. सदर कुलर मधील पाणी पिल्यास त्या पासून त्यांना डेंग्यू, अतिसार सारखे रोग होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
जिल्हा रुग्णालय प्रशासनाने याची त्वरित दखल घेवून कुलर स्वच्छ करावे अशी मागणी रुग्ण सहित नातेवाईक यांच्याकडून होत आहे. जिल्हा रुग्णालयात तिसर्यांदा कुलरमधून रुग्णांना माती मिश्रित येत असल्याची माहिती मिळाली असता कुलरचे फिल्टर काढून पाहिले असता ते अक्षरश मातीने भरलेले होते. ते फिल्टर जिल्हा रुग्णालयाचे प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ पाटील यांच्या निदर्शनास आणून दिले.
देखभालीचा ठेका मार्चमध्ये संपुष्टात
जिल्हा रुग्णालयातील कुलर ची देखभाल करण्यासाठी देण्यात आलेला ठेका हा मार्च 2025मध्ये संपला असून आज पर्यंत नवीन ठेकेदार याची नियुकी करण्यात आली नाही. मात्र कुलर ची देखभाल करण्यासाठी देण्यात आलेला ठेका हा संपला असल्याची माहिती कर्मचारी यांनी जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या सांगितले नसल्याची देखील माहिती समोर आली असल्याचे सामाजिक कार्यकर्ते आरोग्य मित्र सागर पेरेकर यांनी सांगितले.
जो पर्यंत कुलर मधील पाणी रुग्णांना पिण्यायोग्य मिळत नाही तो पर्यंत पाण्याचे जार आणून पाण्याची व्यवस्थ केली जाईल. जिल्हा रुग्णालयात असलेले कुलर ची पाहणी करून फिल्टर हे त्वरित बदलण्यात येथील तसेच यासाठी नवीन ठेकेदार याची नियुक्ती करण्यात येईल.
निशिकांत पाटील, प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक