अज्ञात वाहनाची दुचाकीला जोराची धडक; एकजण जागीच ठार

Raigad accident | मुंबई गोवा महामार्गवरून जात असताना ही दुर्दैवी घटना घडली
Accident
Accidentfile photo
Published on
Updated on

पोलादपूर : तालुक्यातील लोहारे पवारवाडी येथील रहिवासी बाबुराव भोसले हे दुचाकीवरून रात्रीच्यावेळी जात असताना अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात बाबुराव भोसले यांचा जागीच मृत्यू झाला. सीएनजी गॅस पंप नजीकच्या मुंबई गोवा महामार्गवरून जात असताना ही दुर्दैवी घटना घडली.

Accident
Khanapur Crime : बहिणीला अपशब्द वापरल्याचा राग अनावर; मजुराची चाकू खुपसून हत्या

घटनेची माहिती मिळताच पोलादपूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद रावडे यांनी आपल्या संपूर्ण पथकासह तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला असून अज्ञात वाहनाचा शोध सुरू करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून पुढील तपास पोलादपूर पोलीस स्टेशनकडून करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news