Raigad Heavy Vehicle Ban: होळीच्या पार्श्वभूमीवर रायगडमध्ये जड वाहनांना बंदी; पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

२८ फेब्रुवारी ते २ मार्चदरम्यान ठराविक वेळेत निर्बंध; मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रशासन सज्ज
Raigad Heavy Vehicle Ban
Raigad Heavy Vehicle BanPudhari
Published on
Updated on

रायगड : आगामी होळी व धुळीवंदन या सणांच्या अनुषंगाने कोकणात जाणाऱ्या वाहनांमध्ये मोठी वाढ होणार आहे. शनिवार व रविवार अशी जोडून सार्वजनिक सुट्टी आल्याने मुख्य मार्गांवर प्रचंड गर्दी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने 28 फेब्रुवारी ते 2 मार्च दरम्यान तीन दिवस ठराविक वेळेत महामार्गावरील इंदापूर-माणगाव आणि अलिबग-सहाण बायपास -रेवदंडा मार्गावर जड-अवजड वाहनांना बंदी करण्यात आली आहे.

Raigad Heavy Vehicle Ban
Raigad ZP School: जि.प. शाळेत प्रवेश घ्या, घरपट्टी-पाणीपट्टी माफ! वेश्वी ग्रामपंचायतीची अभिनव योजना

आगामी होळी व धुळीवंदन या सणांच्या अनुषंगाने कोकणात जाणारे कोकणवासीय हे आपआपली वाहने घेवुन तसेच एस.टी. बसेस, खाजगी बसेसने मोठ्या प्रमाणात मुंबई-गोवा व खोपोली-पाली-निजामपूर-माणगाव-महाड असे जाणार आहेत. तसेच शनिवार व रविवार अशी जोडून सार्वजनिक सुट्टी आल्याने जिल्हा वाहतूक शाखा रायगडकडून मुंबई-गोवा महामार्ग तसेच वडखळ ते अलिबाग- रेवदंडा-मुरूड कर्जत, खोपोली व इतर मार्गावर वाहतूक कोंडी होवू नये याकरीता बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आलेले आहे.

Raigad Heavy Vehicle Ban
DPS Lake: डीपीएस तलावाचा ‘संरक्षण राखीव’ निर्णय प्रलंबित; फ्लेमिंगोंच्या अधिवासावर संकट

होळी व धुळीवंदन या उत्सवा दरम्यान वाहतुक कोंडी होवु नये म्हणून सदर मार्गावर जिल्हा वाहतुक शाखेकडून 4 अधिकारी व 70 वाहतुक पोलीस अंमलदार तसेच 50 होमगार्ड व समाजसेवी संघटनेचे 50 सेवक असे रहदारीच्या ठिकाणी वरील मार्गावर लावण्यात येणार आहेत. तसेच पोलीस ठाणेकडील जास्तीत जास्त अंमलदार देखील वाहतुक नियमनाकरीता लावण्यात येणार आहेत. मुंबई-गोवा महामार्ग हा इंदापूर माणगांव या ठिकाणी मोठया वाहतूककोंडी होत असल्याने नागरीकांनी खोपोली-पाली-निजामपूर-माणगाव-महाड या मार्गाचा अवलंब करावा, असे आवाहन करण्यातआले आहे.

Raigad Heavy Vehicle Ban
Central Railway Freight Train: लोणावळा घाटात ५३०० टनांची मालगाडी अनियंत्रित; कर्जतजवळ मोठा अनर्थ टळला

अलिबाग-कुरूळ-सहाण-बायपास-रेवदंडा या मार्गाचे काम चालू असल्याने वाहतूक कोंडी होत आहे. या करीता उपाय योजना म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयाकडून अवजड वाहने बंदी आदेश दररोज सकाळी 9 ते 12 व सायंकाळी 5 ते 7 वाजेपर्यंत नोटीफिकेशन काढण्यात आलेले आहे. तसेच रेवदंडा व मुरूडकडे जाणा-या पर्यटकांनी नागोठणे मार्ग भिसे खिंड-रोहा-चणेरा मार्ग रेबदंडा-मुरूड, कोलाड रोहा-चणेरा मार्गे रेवदंडा-मुरूड या पर्यायी मार्गाचा वापर करणेबाबत आवाहनात्मक बोर्ड वडखळ, नागोठणे, कोलाड, रोहा रेवदंडा मुरूड येथे लावण्यात येणार आहेत.

Raigad Heavy Vehicle Ban
Kashedi Ghat security concerns : गुन्ह्यांमुळे कशेडी घाटातील सुरक्षेची ऐशीतैशी

बंदी असलेले मार्ग आणि पर्यायी मार्ग

मुख्य मार्ग : मुंबई-गोवा महामार्ग हा इंदापूर-माणगांव

पर्यायी मार्ग : खोपोली-पाली-निजामपूर-माणगाव-महाड

मुख्य मार्ग :अलिबाग-कुरूळ-सहाण-बायपास-रेवदंडा

पर्यायी मार्ग : नागोठणे मार्गे भिसे खिंड-रोहा-चणेरा मार्गे रेवदंडा-मुरूड

: कोलाड-रोहा-चणेरा मार्गे रेवदंडा-मुरूड

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news