.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
रायगड : गेल्या दोन महिन्यातील पाऊस आणि वादळी वार्यांनी रायगड जिल्ह्यातील जीवित व वित्तहानी केले आहे. जिल्ह्यात मोठी दुर्घटना घडलेली नसली तर सततचा मुसळधार पाऊस, अनेक ठिकाणी निर्माण झालेली पूरस्थिती, वादळी वारे यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत चार जणांचा बळी घेतला आहे. 3 हजार 389 जणांना स्थलांतरीत व्हावे लागले आहे. तर 477 घरांचे नुकसान झाले आहे.
जिल्ह्यात वाढते औद्योगिकीकरण, नागरीकरण, जंगलांचा होणार र्हास, नैसर्गिक नदी, नाले, खाड्यांवर होणारे अतिक्रमण, नद्यांमध्ये साचलेला गाळ यामुळे अतिवृष्टीच्या काळात जिल्ह्यात कमी वेळात पूरस्थिती निर्माण होत आहे. जिल्ह्यातील सावित्री, अंबा, पाताळगंगा, कुंडलिका, गाढी, उल्हास या प्रमुख नद्यांची पातळी अतिवृष्टीमध्ये वाढून आजूबाजूच्या गावांमध्ये घुसते. शिवाय रस्ते, पुलांवरून पाणी आल्याने वाहतूक बंद होण्याच्या घटना घडत आहेत. यावर्षीच्या सततच्या पावसाने जिल्ह्यात मोठे नुकसान केले आहे. गेल्या दोन महिन्यात पावसामुळे चौघांचा बळी गेला आहे. पेण तालुक्यातील सापोली येथे यश नाईक या आदिवासीचा झाड पडून मृत्यू झाला. महाड तालुक्यात दादली येथे नदीमध्ये पडून नामदेव अंबावले यांचा मृत्यू झाला आहे. तर वाळण खुर्द येथे बाळाजी उतेकर हे 62 वर्षीय वृद्ध वाहन गेल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. माणगाव तालुक्यातील टेमपाले येते नसरीन गोडमे हे ओढ्यात वाहून गेले आहेत. अशा प्रकारे पावसाळ्यात चौघा जणांचा मृत्यू झाल्याची नोंद जिल्हा प्रशासनाकडे आहे. जिल्ह्यात पशुधनाचीही हानी झाली आहे. पोलादपूर, पनवेल, माणगाव, सुधागड, महाड, कर्जत आणि म्हसळा या तालुक्यातील म्हैस, बैल, गाय अशा लहानमोठ्या 17 जनावरांचा मृत्यू झाला आहे. चार जनावरे जखमी झाली आहेत.
पुरस्थितीमुळे तळा, पोलादपूर, महाड, खालापूर, कर्जत, माणगाव आणि मुरुड तालुक्यातील हजारो नागरिकांना यावेळी सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करण्यात आले आहे. 126 कुटुंबातील 416 नागरिकांना त्यांच्या नातेवाईकांकडे, 856 कुटुंबांतील 2973 नागरिकांना कॅम्पमध्ये स्थलांतरीत करण्यात आले आहे. एकूण 982 कुटुंबातील 3 हजार 389 नागरिकांना जिल्हा प्रशासनाने सुरक्षित स्थळी स्थलांतरीत केले आहे. जिल्ह्यात घरे आणि सार्वजनिक मालमत्तांचे नुकसान झाले आहे. रोहा तालुका वगळता उर्वरित सर्व तालुक्यांमध्ये नागरिकांच्या घरांची नुकसानी आहे. या 14 तालुक्यातील 11 पक्क्या घरांचे पूर्णत नुकसान झाले आहे. 18 कच्चा घरांचे पूर्णत, 326 पक्क्या घरांचे अंशत आणि 122 कच्चा घरांचे अंशत नुकसान झाले आहे. एकूण 477 घरांचे पूर्णत अथवा अंशता नुकसान झाले आहे. तर 4 झोपड्या, 69 गोठे, 13 दुकानांचेही नुकसान झाले आहे. महाडमधील व्यायामशाळा, पूल, पोलादपुरातील वीज खांब, पेणमधील भंगार गोडावून यांचे पूर्ण नुकसान झाले आहे. तर महाडमधील शाळा इमारत, स्मशानभूमी शेड, खालापूर शाळा इमारत, पोलादपूरात अंगणवाडीची पाणी टाकी, पेणमध्ये स्मशानभूमी, म्हसळा, श्रीवर्धन व तळ्यात शाळा इमारतींचे अशता नुकसान झाले आहे. प्रशासनाकडून जिल्ह्यातील नुकसानीचे पंचनामे सुरु झाले आहेत. त्यामुळे पंचनामे पूर्ण झाल्यानंतर नुकसानग्रस्तांना भरपाई मिळणार आहे.
जिल्ह्यात घरे आणि सार्वजनिक मालमत्तांचे नुकसान झाले आहे. रोहा तालुका वगळता उर्वरित सर्व तालुक्यांमध्ये नागरिकांच्या घरांची नुकसानी आहे. या 14 तालुक्यातील 11 पक्क्या घरांचे पूर्णत नुकसान झाले आहे. 18 कच्चा घरांचे पूर्णत, 326 पक्क्या घरांचे अंशत आणि 122 कच्चा घरांचे अंशत नुकसान झाले आहे. एकूण 477 घरांचे पूर्णत अथवा अंशता नुकसान झाले आहे. तर 4 झोपड्या, 69 गोठे, 13 दुकानांचेही नुकसान झाले आहे.