Ganesha Idols Export | पेणमधून 50 हजार गणेशमूर्ती परदेशात जाणार

१५० वर्षांचा इतिहासः रंगसंगती, बोलके डोळे, भाविकांमध्ये बाप्पांसोबत घट्ट नाते
Ganesha Idols Export
पेणमधून 50 हजार गणेशमूर्ती परदेशात जाणार Ganpati File Photo
Published on
Updated on

रायगड : रायगड जिल्ह्यात या वर्षीच्या गणेशोत्सवासाठी गणेशकला केंद्रांमध्ये मूर्तीकारांची लगबग वाढली आहे. श्रीगणेशाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पेण तालुक्यातील गणेशकला केंद्रांवर दररोज हजारो मूर्ती तयार होत आहेत. तालुक्यातील हमरापूर, कळवा, जोहा, तांबडशेत, दादर, रावे, सोनकार, उरनोळी, हणमंतपाडा, वडखळ, बोरी, शिर्की या गावांत गणेशोत्सवासाठी गणेशमूर्ती बनविल्या जातात. गणेशोत्सवानिमित्ताने पेणमधून ५० हजार गणेशमूर्ती परदेशात तर देशभरात सुमारे ३० लाख गणेशमूर्ती रवाना होणार आहे.

सुबक आखणीमुळे गणेशमूर्तीत जिवंतपणा आणणाऱ्या पेणमधील गणेशमूर्ती कलेला जागतिक स्तरावर स्थान आहे. आकर्षक रंगसंगती, मुर्तीची ऐटदार मांडणी आणि पर्यावरण पूरक साधनांचा वापर यामुळे पेणमधील गणेशमूर्तीना जगभरातून मागणी वाढत आहे. पेणमधील मूर्तीना अमेरिका, युएई, ऑस्ट्रेलिया, जपान, कॅनडा आदी देशांतून मागणी असते.

परदेशातील ग्राहकांना गणेशोत्सवापूर्वी मूर्ती मिळावी, यासाठी एप्रिल-मेपासूनच त्या रवाना केल्या जातात. दोन महिन्यांच्या समुद्र प्रवासात त्या सुरक्षित राहाव्यात, यासाठी पॅकेजिंगकडे विशेष लक्ष दिले जाते. मूर्ती निर्यात करण्यासाठी साधारण दोन कंटेनरसाठी तीन लाख रुपये खर्च येतो. यात मध्यम १ ते २ फूट आकाराच्या ७०० मूर्ती असतात, पेणचे के. वामनराव देवधर आणि के. राजाभाऊ देवधर यांनी या व्यवसायाला चालना दिली. पुढे त्यांच्याकडे शिकणार्या काही कारागिरांनी स्वतः या व्यवसाग सुरु केले आणि हा व्यवसाय भरभराटीस येत गेला. सुबक मूर्ती आणि आकर्षक रंगसंगतीमुळे पेणच्या गणेश मूर्तीची मागणी बाबत गेली. सुरुवातीला कोकण, त्यानंतर मुंबई पुण्यात पेणच्या गणेशमूर्ती जायला लागल्या. हळुहळू राज्यभरातून पेणच्या गणेशमूर्तीना मागणी येण्यास सुरवात झाली. गेल्या काही दशकात या मूर्तींची लोकप्रियता इतकी वाढली की देश विदेशातून पेणच्या गणेशमूतींना मोठी मागणी व्हायला लागली. त्यामुळे गणेशमूर्तीकारांचे गाव म्हणून पेण नावारूपास आहे. दरवर्षी ५० ते ६० कोटीची उलाढाल पेणच्या गणेशमूर्ती कलेचा 150 वर्षाचा इतिहास लाभला आहे.

गणेशमूतीची अंतिम टप्प्यातली लगबग

त्रिमितीय आखणी (श्री डायमेन्शनल) हे पेणच्या गणेशमूर्तीच खास वैशिष्ट्य असल्याने भाविक मूर्तीसमोर कोणत्याही बाजूला उभा राहिल्यास गणेशाची नजर आपल्याकडे आहे असा भाविकाला भास होते. आकर्षक पण सुसंगत रंगसंगती, बोलके डोळे यामुळे गणेशमूर्ती आणि भाविकामध्ये वेगळे नाते निर्माण होते. शहरात १५०, तर जोहे, हमरापूर, बडखळ आणि कामाले आदी गावांत ४०० हून अधिक गणेशमूर्ती बनवण्याच्या कार्यशाला आहेत.

पेण तालुक्यात १५०० अधिक गणेशमूर्ती कला केंद्र आहेत. तालुक्यातील गणेशमूर्तीना परदेशात मोठी मागणी आहे. यावर्षीच्या हंगामात आतापर्यंत १० ते १५ हजार गणेशमूर्ती परदेशात रवाना झाल्या आहेत. संपूर्ण हंगामात पेण तालुक्यातून सुमारे ४५ हजार गणेशमूर्ती परदेशात रवाना होतात. येथे बीज पुरवठ्याची समस्या नेहमीच असून त्यामुळे गणेशमूतीचा वेळेवर पुरवठा करता येत नाही.

अभय महात्रे, अध्यक्ष, गणेश मूर्तीकार महाराष्ट्र प्रतिष्ठान संघटना, पेण

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news