Raigad Fort landslide | किल्ले रायगड पायरी मार्गावरील दरडी हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू

आगामी काळात हा मार्ग अधिक सुरक्षित राहण्याकरता शासनाला विशेष लक्ष द्यावे लागणार आहे; असे मत शिवभक्त अन् ग्रामस्थांनी व्यक्त केले आहे
Raigad Fort landslide | किल्ले रायगड पायरी मार्गावरील दरडी हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू
Published on
Updated on

महाड : हिंदवी स्वराज्याची राजधानी असणाऱ्या किल्ले रायगडावर मंगळवारी रात्री उशिरा झालेल्या मुसळधार पावसात महादरवाजा जवळील कोसळलेल्या दर्डीने पायरी मार्ग बंद केला. या संदर्भातील सार्वजनिक बांधकाम विभागाकडून युद्ध पातळीवर करण्यात येत असलेल्या कामांमध्ये बहुतांश भाग साफ झाल्याचे दिसून येत आहे.

Raigad Fort landslide | किल्ले रायगड पायरी मार्गावरील दरडी हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू
Raigad Fort Security: किल्ले रायगडावरील ५४ सीसीटीव्ही कॅमेरे पुन्हा कार्यान्वित; काही महिन्यांपासून बंद होती यंत्रणा

शनिवारी 27 जून रोजी तिथेनुसार छत्रपती शिवाजी महाराजांचा 353 वा श्री शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न होत आहे. या पार्श्वभूमीवर या ठिकाणी येणाऱ्या शिवभक्तांच्या साठी हा मार्ग सुरक्षित करण्याचे प्रयत्न स्थानिक प्रशासन व सार्वजनिक विभागाकडून सुरू झाले आहेत. मागील काही वर्षात किल्ले रायगडाच्या पायरी मार्गावर घडणाऱ्या घटनांच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून या मार्गावरील दरडी काढण्याचे काम देखील मुंबईतील एका सेवाभावी शिवभक्त संघटनेकडून करण्यात आले होते मात्र त्यानंतर देखील या कोसळलेल्या दर्डीमुळे आगामी काळात हा मार्ग अधिक सुरक्षित राहण्याकरता शासनाला विशेष लक्ष द्यावे लागेल हे निदर्शनास आले आहे.

Raigad Fort landslide | किल्ले रायगड पायरी मार्गावरील दरडी हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू
Raigad fort news | किल्ले रायगड दरड कोसळल्याने पायरी मार्ग 'इतके' दिवस राहणार बंद

दरम्यान जिल्हा प्रशासनाकडून पायरी मार्गावरील घडलेल्या या घटनेची दखल घेऊन दोन दिवसाकरता हा मार्ग शिवभक्तांच्या प्रवासाकरता बंद करण्यात आला आहे. मात्र या संदर्भात आज प्रस्तुत प्रतिनिधी केलेल्या पाहणी दरम्यान व प्राप्त झालेल्या माहितीनुसार या मार्गावरील बहुतांश ठिकाणची आलेल्या दगडी दूर करण्यात बांधकाम विभागाला यश आले आहे. शनिवारी राज्याभिषेक सोहळ्या करता येणाऱ्या शिवभक्तांना हा मार्ग आता पूर्ववत मोकळा झाला आहे. त्यामुळे शासन या मार्गावरून प्रवास करण्यास परवानगी देईल असा विश्वास शिवभक्तांकडून व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news