Raigad fort Shivsamadhi: किल्ले रायगडावर पुरातत्व विभागाचे दुर्लक्ष? शिवसमाधी व राजदरबारातील सुरक्षा कठडे जीर्ण

स्वराज्याच्या राजधानीत दुरवस्था उघड; तुटलेल्या कठड्यांना चिंध्या बांधून वापर, शिवप्रेमींमध्ये नाराजी
Raigad fort Shivsamadhi
Raigad fort ShivsamadhiPudhari
Published on
Updated on

नाते : ईलियास ढोकले

स्वराज्याची राजधानी आणि शिवप्रेमींचे अस्मिता केंद्र असलेल्या किल्ले रायगडाकडे पुरातत्व विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे समोर आले आहे. किल्ले रायगडवरील शिवसमाधी आणि राजदरबारातील सुरक्षा कठडे खराब झाले आहेत.

Raigad fort Shivsamadhi
Dombivli Car Burning: डोंबिवलीत पुन्हा आगडोंब; गोकुळधाम सोसायटीत कारला पेट्रोल टाकून जाळले

राजदरबारात राजसदरेवर आणि शिवसमाधी स्थळाचे पावित्र्य जपण्यासाठी त्याच प्रमाणे सुरक्षेच्या कारणांसाठी लाकडी सुरक्षा कठडे बसवण्यात आले आहेत. या सुरक्षा कठड्यांच्या लाकडी भागांना अनेक ठिकाणी तडे गेले असून काही ठिकाणी ते तुटले आहेत. तुडलेल्या कठड्यांचा कापडाच्या चिंध्या बांधून वापर केला जात आहे.

Raigad fort Shivsamadhi
BMC Administration: ८० हजार कोटींची मुंबई महापालिका अजूनही ऑफलाईन! अजेंडा पोहोचवण्यासाठी कर्मचाऱ्यांना पहाटे 3 वाजता धावपळ

दोन दिवसांपूर्वी पाचाड येथे राजमाता जिजाऊंच्या समाधी स्थळी वणव्यामुळे आग लागली होती. आता महत्वाच्या ठिकाणी असलेल्या सुरक्षा कठड्यांची दुरवस्था समोर आली आहे. यामुळे स्वराज्याच्या राजधानीचा किल्ला त्याचबरोबर शिवप्रेमींच्या अस्मितेचा मानबिंदू असलेल्या किल्ले रायगडाबाबत पुरातत्व विभाग दुर्लक्ष करीत आहे का, असा प्रश्न निर्माण होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news