

अलिबाग ः अतुल गुळवणी
रायगडचे राजकारण हे नेहमीच चर्चेचा विषय राहिलेला आहे.मग ती निवडणूक ग्रामपंचायतीची असो वा नगरपालिकेची,जि.प. असो वा विधानसभेची.या प्रत्येक निवडणुकांमध्ये सर्वच राजकीय पक्षांनी आपापल्या राजकीय वारसदारांना राजकीय पटलावर आणून त्यांचे राजकीय करिअर करण्यात यशस्वी झालेले आहेत.आता सुद्धा दहा नगरपालिकांच्या रिंगणात रायगडात दोन लेकी, दोन सुना आपल्या कुटुंबाचा राजकीय वारसा सांभाळण्यासाठी रिंगणातउतरलेल्या आहेत.
यामध्येअलिबागमधून माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांची कन्याअक्षया नाईक,मुरुडला माजी नगराध्यक्ष मंगेश दांडेकरांची कन्या आराधना नाईक या तर पेणमध्ये आ.रवींद्र पाटील यांची सून प्रीतम पाटील आणि कर्जतला माजी आ.सुरेश लाड यांची सून डॉ.स्वाती पाटील निवडणुकीतउतरल्या आहेत. रायगडात जे अधिकृत उमेदवार आहेत त्यांनी आपापल्या शहरात प्रचाराचा प्रारंभ केलेला आहे.
अलिबाग ः अक्षया नाईकना आई, वडिल, आजीचा वारसा
अलिबाग नगरपालिकेत शेकाप,काँग्रेस आघाडीतर्फे अक्षया प्रशांत नाईक या प्रथमच निवडणुकीच्या रिंगणातउतरलेल्या आहेत.अक्षया नाईक या माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, माजी नगराध्यक्षा स्व.नमिता नाईक यांच्या कन्या आहेत तर माजी नगराध्यक्षा सुनिता नाईक यांची नात आहे. नाईक घराण्याचे अलिबाग नगरपालिकेवर नेहमीच प्राबल्य राहिलेले आहे.त्यामुळे नाईक परिवाराच्या वारसदार म्हणूनच अक्षया यांच्याकडे पाहिले जात आहे.
शिवाय माजी जि.प.अध्यक्षा सुप्रिया पाटील यांच्या त्या भाची आहेत.पाटील,नाईक परिवाराचा राजकीय वारसा त्यांना लाभलेला आहे. शेकापचे पाठबळ आणि काँग्रेसची साथ त्यांना मिळणार आहे. त्यांच्या विरोधात शिवसेना,भाजपतर्फे तनुजा पेरेकर या उभ्या आहेत. यापूर्वी त्या शिवसेनेतर्फे नगरसेविका म्हणून विजयी झालेल्या आहेत.तिसऱ्याअपक्ष उमेदवार कविता ठाकूर यांनीही अर्ज दाखल केलेला आहे.अलिकडेच त्यांनी आणि प्रविण ठाकूर यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.माजी आ.मधूशेठठाकूर यांचा राजकीय वारसा त्यांनाही लाभला आहे. यापूर्वीही त्यांनी नगरसेविका म्हणून काम पाहिलेल आहे.
मुरुडमध्ये दांडेकरांची कन्या
मुरुड नगरपालिकेत माजी नगराध्यक्ष मंगेश दांडेकर यांचे प्रभूत्व राहिलेले आहे.दांडेकर परिवाराचा राजकीय प्रवास काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस,शिवसेना आणि पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस असा झालेला आहे.यावेळी मुरुडचे नगराध्यक्षपद हे महिलांसाठी राखीव असल्याने हाच मोका साधत मंगेश दांडेकर यांनीआपली सुकन्या आराधना दांडेकर यांना प्रथमच निवडणुकीच्या रिंगणातउतरवून आपल्या वारसदारासाठी राजकारणाचे दरवाजे खुले केलेले आहे.त्यांच्या विरोधात शिवसेनेतर्फेकल्पना पाटील याउभ्या आहेत.यापूर्वीही त्यांनी नगराध्यक्ष म्हणून चांगले काम केलेले आहे.त्यांनाही राजकीय पार्श्वभूमी आहे.यामुळे मुरुडला तुल्यबळ लढत अपेक्षित आहे.
पेणला आमदारांची सून मैदानात
पेण नगरपालिकेवर गेल्या काही वर्षात आ.रवीशेठ पाटील यांनीआपले वर्चस्व अबाधित ठेवलेले आहे.काँग्रेसमध्येअसतानाही त्यांनी आपल्या स्नुषा प्रीतम पाटील यांना नगराध्यक्षपदी विराजमान केलेले होते.आता सुद्धा भाजपतर्फे त्याच पुन्हा मैदानातउतरलेल्या आहेत. सासऱ्यांची राजकीय पुण्याई, कुटुंबाचे पाठबळ,भाजपची साथ या जोरावर त्या भविष्य अजमावित आहेत.त्यांच्या विरोधात शहर विकास आघाडीतर्फे रियाधारकर यांनाउतरविण्यात आलेले आहे.रिया धारकर यांनी यापूर्वीही पेणचे नगराध्यक्षपद भूषविलेले आहे. रिया धारकर या माजी मंत्री स्व.प्रभाकर तथा आप्पासाहेबधारकर यांच्या स्नुषा आहेत.कधीकाळी रवीशेठ पाटील आणि आप्पा धारकर हे परस्परांच्या विरोधातउभे ठाकलेले होते.तीच परंपरा आताही दिसून येत आहे.
कर्जतला लाड परिवाराला संधी
कर्जतमध्ये भाजपने डॉ.स्वाती लाड यांना प्रथमच निवडणुकीच्या रिंगणातउतरविलेले आहे.स्वाती लाड या माजी आम.सुरेश लाड यांच्या स्नुषा आहेत.सुरेशभाऊ लाड यांनी कर्जतचे दोनवेळा आमदार म्हणून प्रतिनिधीत्व केले आहे.त्यांचाही राजकीय प्रवास काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस,भाजप असाझालेला आहे.सध्या ते तसे राजकीय घडामोडींपासून काहीसे अलिप्त आहेत.पण आता सुनबाईच रिंगणात उतरल्याने सासरेबुवाही प्रचारात उतरल्याचे दिसत आहे.त्यांच्या विरोधात शिवसेनेन पुष्पा तगडे यांना उमेदवारी दिलेली आहे.विशेष म्हणजे तगडे या माजी नगरसेविका आहेत.
महाडमध्ये माजी नगराध्यक्ष रिंगणात
महाड नगरपालिकेतही निवडणुकीची चुरस निर्माणझालेलीआहे.येथे शिवसेना विरोधात राष्ट्रवादी,भाजप अशी युती झालेली आहे.शिवसेनेने माजी नगराध्यक्ष सुनील कविस्कर यांनाउमेदवार दिली आहे.तर राष्ट्रवादीने सुरेश कळमकर यांना रिंगणातउतरविलेआहे.कविस्कर हे काँग्रेस,शिवसेनेकडून नगराध्यक्ष झालेले आहेत.गेली तीन दशके ते महाडच्या राजकारणात सक्रिय आहेत.यामुळे या लढतीकडे महाडचे लक्ष लागलेले आहे.