Raigad | जिल्हा क्रीडा संकुल होणार अद्ययावत

15 कोटींचा प्रस्ताव शासनाच्या क्रीडा विभागाला सादर
district sports complex upgrade
जिल्हा क्रीडा संकुल होणार अद्ययावतpudhari photo
Published on
Updated on

अलिबाग : सुवर्णा दिवेकर

क्रीडा विभाग आणि लोकप्रतिनिधी यांच्या दुर्लक्षामुळे क्रीडा संकुलाची दुर्दशा झाली आहे. जिल्हा क्रीडा संकुलाचा मेकओवर करण्यासाठी 15 कोटीचा प्रस्ताव क्रीडा विभागाकडे पाठविला आहे . त्यामुळे लवकरच जिल्हा क्रीडा संकुल हे अद्यावत होणार आहे.

2001 च्या क्रीडा धोरणानुसार राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात क्रीडा संकुल बांधण्यात आले. त्यांनतर 2003 मध्ये 4 कोटी रुपये मंजूर करून त्यामध्ये धावण्याचा ट्रॅक, इनडोअर क्रीडा प्रकारासाठी हॉल विविध खेळांची मैदाने तरणतलाव व्यायामशाळा प्रेक्षक गॅलेरी यांचा समावेश होता.

रायगड जिल्ह्यातही खेळाडूची उत्तम खाण आहे. जिल्ह्यातील अनेक खेळाडू विविध खेळात राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकत आहेत. खेळाडूंना सराव करण्यासाठी आणि जिल्हा क्रीडा स्पर्धा खेळण्यासाठी भव्य अशा क्रीडा संकुलाची गरज जिल्ह्याला होती. त्यानुसार अलिबाग तालुक्यातील नेहुली येथे 12 एकर जागा क्रीडा संकुलसाठी मंजूर केली होती. या संकुलात फुटबॉल, धावपट्टी, व्हॉलीबॉल, टेनिस कोर्ट, लांब उडी, क्रिकेट या आउट डोअर खेळासाठी मैदान तयार केले आहे. तर जलतरण तलाव, इनडोअर खेळाची सुविधा संकुलात केलेली आहे. मात्र सध्या संकुलाची अवस्था बिकट झालेली आहे.

district sports complex upgrade
Raigad ZP recruitment : रायगड जिल्हा परिषदेला रिक्त पदांचे ग्रहण

रायगड जिल्ह्यातून राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू घडावेत यासाठी अलिबाग नेहुली येथे 12 एकरात क्रीडा संकुल उभारले आहे. इनडोअर आणि आउटडोअर खेळासाठी मैदाने तयार करण्यात आली आहेत. मात्र क्रीडा विभाग आणि लोकप्रतिनिधी यांच्या दुर्लक्षामुळे क्रीडा संकुलाची दुर्दशा झाली आहे. स्पर्धेसाठी येणार्‍या खेळाडूंनाही या संकुलातील असुविधाचा त्रास सहन करावा लागत आहे.

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या वेळी क्रीडा संकुल चा वापर करण्यात येतो. कोविड काळातही विलगीकरणासाठी ह्याचा वापर केला गेला. यामुळे कित्येक वेळा खेळाडू खेळापासून हे वंचित राहिले आहेत.

district sports complex upgrade
Raigad News : खोपोली नगराध्यक्षपदाच्या नव्या आरक्षण सोडतीकडे लक्ष

जिल्हा क्रीडा संकुल हे अद्यावत करण्यासाठी प्रयत्न केले होते. मात्र कोरोना, निसर्ग चक्रीवादळ या नैसर्गिक आपत्तीमुळे क्रीडा संकुलाकडे दुर्लक्ष झाले. क्रीडा संकुलाचा वापर हा निवडणुकीसाठी ही केला जात आहे. यापुढे निवडणुकीसाठी वापर थांबविण्याचा प्रयत्न केला जाईल. क्रीडा संकुलासाठी 15 कोटीचा प्रस्ताव क्रीडा विभागाकडे पाठविला आहे. लवकरच क्रीडा संकुल अद्यावत केले जाईल. माणगाव येथे विभागीय क्रीडा संकुल मंजुरी मिळाली होती. मात्र काही कारणास्तव ते रद्द होऊन पनवेल किंवा नवी मुंबईत होणार आहे. माणगाव येथे अडिशनल विभागीय क्रीडा संकुलाची मागणी केलेली आहे.

आदिती तटकरे, महिला व बाल विकास, मंत्री

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news