Raigad Dams: समाधानकारक पावसामुळे रायगडमधील धरणांत ९६ टक्के पाणीसाठा

तीव्र उन्हामुळे पाण्याचे बाष्पीभवन वेगात; पाणीसाठ्यावर परिणाम होण्याची शक्यता
Raigad Dam Water Storage
Raigad Dam Water Storage Pudhari
Published on: 
Updated on: 

महादेव सरसंबे

रोहे: यावर्षी पाऊस उशिरा झाला असला तरी रायगड जिल्ह्यात चांगला पाऊस पडला आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील धरणक्षेत्रात चांगला पाणीसाठा असून रायगड जिल्ह्यातील २८ धरणक्षेत्रात ९६.५५ टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे.

रायगड जिल्ह्यातील रायगड पाटबंधारे विभाग कोलाड अंतर्गत २८ धरणापैकी २० धरणे १०० टक्के भरली आहेत. उर्वरित ८ धरणापैकी सर्वात कमी पाणीसाठा श्रीवर्धन तालुक्यातील रानीवली धरणक्षेत्रात ५१ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.

Raigad Dam Water Storage
Vikhroli Molestation Case: रिक्षा चालकाकडून बालिकेचा विनयभंग; रिक्षातून फिरवण्याच्या बहाण्याने निर्जनस्थळी नेले

त्यानंतर श्रीवर्धन तालुक्यातील कार्ले धरणक्षेत्रात ६३ टक्के, अलिबाग तालुक्यातील श्रीगाव धरणक्षेत्रात ९६ टक्के व उर्वरित महाड तालुक्यातील वरंध धरणक्षेत्रात ९९ टक्के, खैरे धरणक्षेत्रात ९९ टक्के, कर्जत तालुक्यातील साळोख धरणक्षेत्रात ९९ टक्के, अवसरे धरणक्षेत्रात ९९ टक्के पनवेल तालुक्यातील बामणोली धरणक्षेत्रात ९९ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.

२८ धरणक्षेत्रात पाणीसाठा पहाता मुरुड तालुक्यातील फणसाड, तळा तालुक्यातील वावा, रोहा तालुक्यातील सुतारवाडी, पेण तालुक्यातील आंबेघर, अलिबाग तालुक्यातील श्रीगाव, सुधागड तालुक्यात कोंडगाव, घोटवडे, ढोकशेत, कवेळे, उन्हेरे ही धरणे जवळज‍वळ शंभर टक्के भरली आहे. श्रीवर्धन तालुक्यातील कार्ले ६३ टक्के, कुडकी १०० टक्के, रानीवली ५१ टक्के, म्हसळा तालुक्यातील पाभरे टक्के, संदेरी १०० टक्के, महाड तालुक्यातील वरंध ९९ टक्के, खिंडवाडी १०० टक्के तर उर्वरित धरणांमध्येही मुबलक पाणीसाठा आहे.

Raigad Dam Water Storage
Thane Slum Rehabilitation: ठाण्यात झोपडीधारकांसाठी मोठी बातमी! ५४ योजनांमध्ये सदनिकांचा ताबा; २६ प्रकल्पांचे काम सुरू

मात्र पावसाची दिर्घ विश्रांती आणि तीव्र उन्हाळ्यामुळे पाण्याचे बाष्पीभवन वाढत असून पाणी साठ्यावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news