Raigad Unseasonal Rain | बिरवाडी परिसराला अवकाळी वादळी पावसाचा तडाखा; पाच घरांचे नुकसान

खरवली आणि सोलम कोंड परिसरातील पाच नागरिकांच्या घरांचे नुकसान
Birwadi Unseasonal Rain
Birwadi Unseasonal Rain Pudhari
Published on
Updated on

Birwadi Unseasonal Rain

महाड : मागील महिनाभरापासून वाढलेल्या उष्णतेने त्रस्त झालेल्या बिरवाडी परिसराला गुरुवारी (दि. ७) अचानक आलेल्या अवकाळी वादळी पावसाने जोरदार झोडपले. या वादळी पावसामुळे खरवली आणि सोलम कोंड परिसरातील पाच नागरिकांच्या घरांचे अंशतः नुकसान झाल्याची माहिती महाड तहसील कार्यालयाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली आहे.

या घटनेची गंभीर दखल घेत तहसीलदार महेश शितोळे यांनी नुकसानग्रस्त घरांचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश संबंधित यंत्रणेला दिले असल्याचे सांगितले.

Birwadi Unseasonal Rain
Raigad News | विकासकामांसाठी डोंगर पोखरले.... आता रायगड जिल्ह्यात अनेक गावांवर दरडींची टांगती तलवार!

सायंकाळी साडेचारच्या सुमारास परिसरात अचानक जोरदार वादळी वाऱ्याला सुरुवात झाली. काही वेळातच या वाऱ्याने अवकाळी पावसाचे स्वरूप घेतल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. या वादळात मौजे खरवली येथील प्रवीण नामदेव दशगोंकार यांच्या घराचे छप्पर उडून गेले.

तसेच सोलम कोंड येथील कृष्णा पवार, भालचंद्र साळुंके, सुरेश राखाडे आणि प्रमिला सुतार यांच्या घरांचे अंशतः नुकसान झाल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

Birwadi Unseasonal Rain
Raigad political news: म्हसळा नगराध्यक्षपदाची 7 मे ला निवडणूक; नगरसेवकांमधूनच होणार निवड

दरम्यान, महाड शहरातही सायंकाळी अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे बाजारपेठेत खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची एकच धावपळ उडाली. सुरक्षिततेच्या कारणास्तव सुरू असलेल्या विविध कामांसह वीज वितरण विभागाने खबरदारीचा उपाय म्हणून काही काळ विद्युत पुरवठा बंद ठेवला होता. सायंकाळी सहानंतर वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आल्याची माहिती महावितरणकडून देण्यात आली.

प्रशासनाच्या माहितीनुसार, वृत्त लिहितेवेळी खरवली आणि सोलम कोंड वगळता महाड तालुक्यात अन्य ठिकाणी कोणत्याही मोठ्या नुकसानीची नोंद झालेली नव्हती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news