रायगड: जेएनपीटी येथे तस्करीचा डाव उधळला; ३२ कोटींच्या सुपारी जप्त

रायगड: जेएनपीटी येथे तस्करीचा डाव उधळला; ३२ कोटींच्या सुपारी जप्त
Published on
Updated on


उरण: महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) मुंबई येथील कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी गुप्त माहितीच्या आधारावर 32.31 कोटी रूपयांची सुपारी जप्त केली. डीआरआयच्या अधिकाऱ्यांना संशय आल्याने ३१ ऑगस्टरोजी जेएनपीटी येथून १४ ४० फुटी कंटेनर्स ताब्यात घेतले होते. तळेगाव येथील आंतरराष्ट्रीय कंटेनर डेपोत पाठविण्यात येणार असलेल्या या कंटेनर्समध्ये सुपाऱ्या लपविल्याचा संशय आल्याने अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली.

तळेगाव येथील डेपोमध्ये पोहोचण्यापूर्वीच हे चोरण्यात येतील किंवा बदलले जाऊन दुसऱ्या मार्गाने पाठवण्यात येतील, असा संशय आल्याने हा माल जेएनपीटी बंदरातच थांबवून ताब्यात घेण्यात आला होता. आयात विषयक प्रकटीकरण तपशील तसेच बिलात जाहीर केल्यानुसार या कंटेनर्समध्ये 'कॅल्शियम नायट्रेट' हे रसायन असणे अपेक्षित होते. मात्र, कंटेनर्सची तपासणी केल्यानंतर असे आढळून आले की, हे फसवणुकीसाठी चुकीचे घोषणापत्र सादर करण्याबाबतचे प्रकरण आहे. १४ कंटेनर्समध्ये सुपाऱ्या भरलेल्या असून कॅल्शियम नायट्रेटच्या नावाखाली त्यांची भारतात तस्करी करण्यात आली होती.

परदेशातून भारतात आयात केल्या जाणाऱ्या दर एक टन वजनाच्या सुपाऱ्यांवर केंद्र सरकार १०, ३७९ अमेरिकी डॉलर्स इतके शुल्क आकारते. म्हणजेच, आज ताब्यात घेण्यात आलेल्या १४ कंटेनर्स मधील एकूण ३,७१,०९० किलो (३७१ टन) म्हणजेच सुमारे ३२.३१ कोटी रुपयांच्या सुपाऱ्या जप्त करण्यात आल्या आहेत. फोडलेल्या सुपाऱ्यांवर त्यांच्या एकूण किमतीच्या ११० % आयात शुल्क लागू होत असते. म्हणजेच, या प्रकरणात अंदाजे ३६ कोटी रुपयांचे सीमा शुल्क बुडविण्याचा प्रयत्न झाला होता. तस्करी करून देशात आणण्यात येणाऱ्या सुपाऱ्यांच्या जप्तीपैकी ही सर्वात मोठी कारवाई आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news