रायगड: कसारा घाटाजवळ ट्रक अपघातात चालक ठार

रायगड: कसारा घाटाजवळ ट्रक अपघातात चालक ठार
Published on
Updated on

कसारा, पुढारी वृत्तसेवा: मुंबई – नाशिक महामार्गावरील कसारा घाटाच्या सुरूवातीला लतीफवाडीजवळ उभ्या असलेल्या आयशर टेम्पोला पाठीमागून ट्रक धडकला. त्याच दरम्यान ट्रकला एका अज्ञात वाहनाने मागून धडक दिल्याने ट्रक जागीच पलटी झाला. ट्रकखाली सापडल्याने चालकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज (दि.९) पहाटे दोनच्या सुमारास घडली. छोटेलाल रवी (वय ४८, रा. उत्तर प्रदेश) असे मृत ट्रक चालकाचे नाव आहे. अपघातानंतर महामार्ग पोलीस घोटी केंद्र आणि कसारा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

याबाबत अधिक माहिती अशी की, मुंबईहून नाशिककडे भरधाव जाणाऱ्या ट्रकवरील (एमएच०४ सीए ९३००) चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक एका धाब्यावर उभ्या असलेल्या आयशर टेम्पोला (एमएच १५ जीवाय ५०७६) पाठीमागून धडकला. त्याच दरम्यान ट्रकला एका अज्ञात वाहनाने मागून धडक दिल्याने ट्रक जागीच पलटी झाला. यात ट्रक चालकाचा जागीच मृत्यू झाला.

अपघाताची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन टीमचे शाम धुमाळ, देवा वाघ, दत्ता वाताडे, बाळू मांगे, लक्ष्मण वाघ यांनी क्रेनच्या साहाय्याने ट्रकमधील अडकलेल्या ट्रक चालकाचा मृतदेह बाहेर काढला. कसारा प्राथमिक आरोग्य केंद्रात मृतदेह शवविच्छेदनासाठी नेण्यात आला. कसारा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी रमेश तडवी पुढील तपास करीत आहेत..

मुसळधार पावसामुळे मदत कार्यात अडचण

दरम्यान, आपत्ती व्यवस्थापनच्या टीमला मुसळधार पावसामुळे व्यत्यय येत होता. परंतु टीम सदस्यांनी पोलिसांच्या मदतीने अडकलेला मृतदेह एक तासाच्या अथक परिश्रमानंतर बाहेर काढला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news