पोलादपूर ; पुढारी वृत्तसेवा : मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटात खेड हद्दीत मुंबईच्या दिशेने जाणारी रुग्णवाहिका पलटी झाली. ही घटना आज (शुक्रवार) सकाळी ७.४५ वाजण्याच्या सुमारास कशेडी गाव हद्दीत घडली.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, रत्नागिरी ते ठाणे अशी जाणारी रुग्णवाहिका क्र. MH 08/AP/3894 ही चालक निखिल नवनाथ शिबिलकर (वय- २८), रा. रत्नागिरी हा वॉर्डबॉय अमित मनोज जाधव (वय-४०) रा. रत्नागिरी यांच्यासह ठाणे येथे कोविड किट घेऊन रुग्णवाहिकेतून जात होते. दरम्यान सकाळी ०७.४५ वाजता कशेडी गाव हद्दीत हॉटेल अनुसयाच्या समोर आले असता चालकाचा गाडीवरील ताबा सुटून रुग्णवाहिका रस्त्याच्या बाजूला असलेल्या खड्ड्यात पलटी झाली. या अपघातात वॉर्ड बॉय अमित जाधव यांच्या डाव्या हाताला फ्रॅक्चर झाला. या अपघातात रुग्णवाहिकेचे किरकोळ नुकसान झाले आहे.
या घटनेची माहिती समजतात कशेडी महामार्ग मदत केंद्राचे पोलीस उपनिरीक्षक अनिल चांदणे यांनी पोलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेऊन जखमी वार्डबॉयला उपचारासाठी रुग्णालयात पाठविले. दरम्यान या मार्गावरील वाहतूक सुरळीत चालू आहे.
हेही वाचा :