रायगड : पनवेलमध्ये कारमधून सहा लाखाची रोकड जप्त

Maharashtra Assembly Election : निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकाची कारवाई
Maharashtra Assembly Election
Published on
Updated on

पनवेल : निवडणुकीच्या स्थिर सर्वेक्षण पथकाने शुक्रवारी (दि.२५) पळस्पे फाटा चेक पोस्ट येथे एका चारचाकी कारमधून सहा लाखाची रोकड जप्त केली. ही कारवाई सकाळी १२ च्या दरम्यान करण्यात आली.

Maharashtra Assembly Election
Raigad Rain Update | रायगड जिल्ह्यात आगामी चार दिवस मेघगर्जनांसह पावसाचा इशारा

विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी १५ ऑक्टोबरपासून आचारसहिता लागू झाली करण्यात आली आहे. यादरम्यान स्थिर सर्वेक्षण पथक ये - जा करणाऱ्या वाहनांवर लक्ष्य ठेवून आहे. पनवेल विधानसभा मतदारसंघ अंतर्गत स्थिर सर्वेक्षण पथकाच्या वतीने आज (शुक्रवारी) पळस्पे फाटा चेक पोस्ट येथे सकाळी १२ वाजता ये- जा करणाऱ्या वाहनांची तपासणी सुरू होती. यादरम्यान एका चारचाकी कारची तपासणी केली असता कारमध्ये ६ लाखाची रोख रक्कम संशयास्पदरित्या आढळून आली. ही रक्कम जप्त करून पथकाच्या वतीने वाहनचालकावर कारवाई केली. ही कारवाई पनवेल विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी पवन चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी  विजय पाटील, आचारसंहिता पथक प्रमुख भारत राठोड, सहाय्यक खर्च निरीक्षक . विजय फासे, सहाय्यक खर्च निरीक्षक संजय आपटे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी संजय भालेराव, आचार संहिता पथक प्रमुख संदिप कराड, आचार संहिता सनियंत्रण अधिकारी  शरद गीते, सहाय्यक आचार संहिता पथक प्रमुख जी.एस. बहिरम, सहाय्यक आचार संहिता पथक समन्वयक दिनेश भोसले, नितेश चिमणे,  तुषार म्हात्रे तसेच पळस्पे फाटा चेक पोस्टवरील एसएसटी पथकाचे प्रमुख  किरण पोकळे, कामोठे पोलिस स्टेशन ठाण्याचे पोलिस शिपाई जितेश नवघरे, तळोजा पोलिस ठाण्याचे पोलिस शिपाई प्रकाश म्हस्के उपस्थित होते.

Maharashtra Assembly Election
Raigad | रायगड जिल्ह्यात 4 लाख 72 हजार कुटुंबांना नळ कनेक्शन

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news