कोकणात पहिल्यांदाच होणार ‘पर्पल राईस’चे उत्पादन

सीड बँकेच्या माध्यमातून बियाणे परिसरात उपलब्ध करून देणार
Purple Rice
Published on
Updated on
जयंत धुळप

रायगड : इंडोनेशियातील प्रसिद्ध पर्पल राईस अर्थात निळ्या तांदळाची लागवड यंदा कोकणात प्रथमच करण्यात येणार आहे. प्रायोगिक तत्त्वावर हा प्रयोग राबवण्यात येणार आहे. या प्रयोगातून उत्पादित होणार्‍या तांदळाच्या उत्पादनातून सीड बँक तयार करण्यात येईल. उपलब्ध होणारे बियाणे आगामी वषीर्र् परिसरातील शेतकर्‍यांना उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे. रायगड जिल्ह्यातील गुळसुंदे येथील प्रगतिशील शेतकरी मीनेश गाडगीळ यांनी ‘पुढारी’शी बोलताना दिली.

Purple Rice
देवदर्शनावरून येत असताना अपघात; एक ठार; तिघे जखमी

लाल तांदूळ, काळा तांदूळ, बासमती, आंबेमोहर, मधुमेह नियंत्रणात प्रभावी आरएनआर तांदूळ अशा तांदळाच्या जातींचे उत्पादन घेण्याचे प्रयोग गाडगीळ यांनी केले आहेत. त्याच अनुभवाच्या शिदोरीवर आता निळा तांदूळ घेण्यात येणार आहे.

रायगड जिल्ह्यात मुख्यत्वेकरून भात पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. साधारण जया, रत्ना, कोलम अशा पारंपरिक वाणांचे उत्पादन होते. विशेषकरून कोकण परिसरातील आहाराचा विचार करून म्हणजे भात, भाकरी, पोहे, घावन इत्यादीच्या गरजेनुसार हा तांदूळ पिकवला जात असे. सध्या औद्योगिकीकरणामुळे निर्माण झालेली आजूबाजूची विकसित शहरे व मागणी यांचा विचार करून शेतीत नावीन्यपूर्ण प्रयोग करून त्पादन वाढवण्याची गरज आहे. त्याचाच प्रयत्न म्हणून निळ्या तांदळाची सीड बँक करणार असल्याचेही गाडगीळ यांनी सांगितले.

Purple Rice
Nashik Accident | गंगापूर धरण परिसरात पर्यटकांच्या कारचा अपघात, एकाचा मृत्यू

उत्पादकता भरपूर

थायोमल्ली जस्मीन राईस नावानेही हा तांदूळ ओळखला जातो. लहान मुलांच्या वाढीत उपयुक्त तसेच भरपूर प्रोटिन्स असणार्‍या निळ्या तांदळात रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्याचे तसेच कॅन्सर प्रतिबंधात्मक गुणधर्म आहेत. या तांदळाची एकरी 30 ते 40 क्विंटल उत्पादकता आहे. प्रतिकिलो 250 ते 300 रुपये विक्री दर मिळू शकणार असल्याने शेतकर्‍यांचा आर्थिक फायदा होणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news