Shivrajyabhishek Raigad 2026: शिवराज्याभिषेक सोहळ्याचे काटेकोरपणे नियोजन; शिवभक्तांसोबत सलोखा ठेवावा

शिवभक्तांसोबत सलोखा ठेवावा;खर्च करताना काटकसरीने करावा
Shivrajyabhishek Raigad 2026
Shivrajyabhishek Raigad 2026Pudhari
Published on
Updated on

रायगड: शिवराज्याभिषेक सोहळा कार्यक्रमाचे दुर्गराज रायगड येथे तारखेनुसार 6 जून व तिथीनुसार 26 जून 2026 रोजी आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या नियोजनाची जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या अध्यक्षतेखाली सर्व प्रमुख विभागांची दुरदूश्यप्रणालीद्वारे आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी या कार्यक्रमाचे काटेकोर नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित सर्व शासकीय यंत्रणेला दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित या बैठकीला जिल्हा पोलीस अधीक्षक आचल दलाल, उपजिल्हाधिकारी (सा.प्र.)डॉ. रविंद्र शेळके, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.निशिकांत पाटील, कार्यकारी अभियंता,सा.बां.विद्युत विभाग पेण, प्र.अ.दोडे, कार्यकारी अभियंता,विद्युत सा.बां.विभाग, अलिबाग पुजा जाधव, उप कार्यकारी अभियंता, बांधकाम जि.प.सचिन बैकर, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.रत्नाकर काळे आदि प्रत्यक्ष तर जिल्ह्यातील शासकीय विभागांचे अधिकारी दुरदूश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.

Shivrajyabhishek Raigad 2026
Prabodh Davkhare NCP Entry: प्रबोध डावखरेंनी बांधले राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ

उपस्थितांना मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी सांगितले की, शिवराज्याभिषेक सोहळा कार्यक्रम सुनियोजित व सुव्यवस्थितपणे पार पाडण्याची जबाबदारी सर्वांवरच आहे. तेव्हा प्रत्येकाने आपले काम चोखपणे करावे. शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त किल्ले रायगडावर येणाऱ्या शिवभक्तांना कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी प्रशासनाने वेगवेगळ्या समित्यांची नेमणूक केली आहे.

मुख्यत्वे आरोग्य, पाणी पुरवठा, मंडप, खानपान, राजशिष्टाचार, परिवहन, विद्युत, पाणी आणि शौचालय आदी सर्व समित्यांची नेमणूक केली आहे. या समित्यांनी आपल्या नेमून दिलेल्या कामांचे योग्य ते सूक्ष्म नियोजन करुन कार्यक्रम यशस्वीरित्या कशाप्रकारे संपन्न होईल ते पहावे. तसेच खर्च करताना काळजी पूर्वक खर्च करुन काटकसरीच्या धोरणाचा अवलंब करावा असेही त्यांनी यावेळी सांगितले.

Shivrajyabhishek Raigad 2026
Shiv Sena BJP dispute: हिंमत असेल तर विषयांवर सभागृहात चर्चाकरा; भाजपचे उपमहापौर कृष्णा पाटील यांचे शिवसेनेला आव्हान

आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास वैद्यकीय पथक सुसज्ज ठेवावे, गडावर पुरेश्या प्रमाणात वैद्यकीय पथक, स्ट्रेचर, औषधसाठा ठेवावा. विशेषता सर्पदंश होण्याची शक्यता लक्षात घेऊन त्याप्रमाणे औषधे उपलब्ध ठेवावीत.

पावसाची शक्यता लक्षात घेऊन मंडप, भोजन, विद्युत आणि आरोग्य व्यवस्था तैनात ठेवाव्यात येणाऱ्या नागरिकांच्या वाहनांचे पार्किंग,पिण्याचे पाणी, आरोग्य, स्वच्छता तसेच या कालावधीत आवश्यक असणाऱ्या विविध सुविधा उपलब्ध व्हाव्या यासाठी सूक्ष्म नियोजन करून कार्यवाही करावी, असे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी सूचित केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news