

पोलादपूर ः राज्यातील नगरपालिका महानगरपालिकाच्या निवडणूक झाल्यानंतर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूक प्रचार जोरात सुरू आहे असे असले तरी राज्यात असलेले सत्ताधारी पक्षातर्फे पोलादपूर तालुक्यातील आरोग्य सेवा सह शिक्षणासह धरणाच्या कामांना गती कशी देता येईल यासाठी प्रयत्न करणे गरजेचे बनले होते मात्र ती आशा फोल ठरल्या नंतर तालुक्यातील दर्जेदार आरोग्य सेवासह शैक्षणिक विभाग चा प्रश्न सोडविण्याचे स्वप्नवत आश्वासने उमेदवार याच्या मार्फत देण्यात येत आहे मात्र गेली अनेक निवडणुकीत ह्या आश्वासनाचा विसर सोईस्कर पडला असल्याचे दिसून आले आहे
पोलादपूरतालुक्यातील 42 ग्रामपंचायत व 1 नगरपंचायत असलेल्या व सुमारे 50 हजार लोकसंख्या असलेल्या पोलादपूर तालुक्यातील आरोग्य सेवा उपलब्ध आहे. तालुक्यात 1 ग्रामीण रुग्णालय आणि 2 प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत मात्र तालुक्यातील महामार्ग सह राज्य मार्ग लक्षात घेता दर्जेदार रुग्णालय असणे गरजेचे बनले आहे विकासकामा मध्ये आरोग्य सेवा शैक्षणिक सेवासारख्या महत्वपूर्ण गरजाना प्राधान्य देणे गरजेचे बनले आहे.
पोलादपूरतालुक्यात पोलादपूर ग्रामीण रुग्णालय यासह पितळ वाडी प्राथमिक आरोग्य केंद्र, व पळचिल प्राथमिक आरोग्य केंद्र असे 2 आरोग्य केंद्र आणि या अंतर्गत 8 उपकेंद्र आहेत.पोलादपूर तालुक्यात दोन आरोग्य केंद्र असून मुंबई गोवा महामार्ग लगत असलेल्या पळचिल येथील प्राथमिक आरोग्य केंद्र तर दूसरे पितळवाडी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. त्याधुनिक यंत्रणा व वैद्यकीय अधिकारी ची कमतरता लक्षात घेता अपघात ग्रस्त व्यक्तींना प्राथमिक उपचार करण्यात येतात व पुढील उपचारासाठी मुंबईकडे पाठविले जात असल्याने तालुक्यात दर्जेदार नवीन ट्राम केअरच्या धर्तीवर किंवा गोर गरीब नागरिकांना परवडणारे धर्मदाय रुग्णालय उभारणे गरजेचे बनले आहे.
पलचिल आरोग्य केंद्र हे महामार्ग पासून 3 किमी आत आहे मात्र या ठिकाणी उपचार घेणाऱ्यांची संख्या तुरळक आहे मात्र महामार्ग वर भीषण अपघात झाक्यास पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करत पुढील उपचार साठी इतर मोठ्या रुग्णालयात हलविण्यात येत असल्याचे विदारक चित्र वेळोवेळी दिसून आले आहे.
मार्गवर आपघाताचे प्रमाण लक्षात घेता महामार्ग वर आधुनिक उपचार यंत्रणा निर्माण करणे गरजचे बनले आहे आरोग्य सेवा सह तालुक्यातील शिक्षण विभागाकडे दुर्लक्ष झाले आहे राजीप शाळांची अवस्था बिकट आहे त्यातच नव्याने शिक्षक भरती झाली असली तरी शाळेत विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण सह मैदानी खेळाचे महत्व पटवून देणे गरजचे बनले आहे
तंत्रज्ञानाचे युग लक्षात घेता तालुक्यात एखादे उच्च महाविद्यालय उभारणे गरजचे बनले आहे त्याच प्रमाणे किमान कौशल्य अभ्यास क्रम राबविणे गरजेचे बनले.मात्र या दोन्ही कडे दुर्लक्ष होत विकास कामे सभागृह ,वाडी वरचा रस्ता यामध्ये अडकलेलं दिसुन येत आहे विद्यार्थी च्या भविष्यचा व देशाच्या भविष्यातील घडामोडी बघता येणाऱ्या काळात विकास कामात आरोग्य सेवा सह शिक्षण ला महत्व देणे गरजेचे बनले आहे.
पोलादपूरतालुक्यातील अनेक गावे दुर्गम असल्याने नव्याने प्राथमिक आरोग्य केंद्र ची निर्मिती करणे गरजेचे बनले आहे कोरोना व्हारस संसर्ग या महामारी च्या काळात तालुक्यातील आरोग्य यंत्रणा देवदूता सारखी धावून आली होती. तालुका प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेने दिवस-रात्र काम करून कोरोना ची साखळी खंडित करण्यावर यश मिळवले होते. मात्र त्या नंतर या सेवेकडे हवे तसे लक्ष दिले गेले नसल्याचे दिसून येत आहे ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन यंत्रणा आहे मात्र अत्याधुनिक यंत्रणा व वैद्यकीय अधिकारी ची कमतरता लक्षात घेता अपघात ग्रस्त व्यक्तींना प्राथमिक उपचार करण्यात येतात व पुढील उपचारासाठी मुंबईकडे पाठविले जात असल्याने तालुक्यात दर्जेदार नवीन ट्राम केअरच्या धर्तीवर किंवा गोर गरीब नागरिकांना परवडणारे धर्मदाय रुग्णालय उभारणे गरजेचे बनले आहे.