Poladpur Taluka Election: पोलादपूर तालुक्यात आरोप-प्रत्यारोपांचा गदारोळ; विकासाचे प्रश्न मात्र अनुत्तरित

निवडणूक प्रचारात करमणूक वाढली, पण आरोग्य, पाणी, रस्ते व रोजगारावर ठोस आश्वासनांचा अभाव
Raigad ZP Election
Raigad ZP Electionpudhari photo
Published on
Updated on

पोलादपूर : समीर बुटाला

तालुक्यातील निवडणूक प्रचार दरम्यान उमेदवार सह नेते मंडळी मार्फत आरोप प्रत्यारोप करण्यात येत असल्याने मतदाराचे मनोरंजन व करमणूक होत आहे उमेदवारासह प्रचारक एकमेकांची उणीधुनी बाहेर काढत मताचा जोगवा मागत आहेत मात्र तालुक्यातील ठोस विकार कामे आरोग्य ,पर्याय रस्ते ,पाणी योजना ,जलजीवन मिशन ,रोजगार निर्मिती ,शेती व्यवसाय जोडधंदा उपाययोजना , राजिप शाळा ,क्रीडा संकुल बाबत ठोस आश्वासन मिळत नसल्याने तालुक्यातील अनेक प्रश्न आवाचून उभे आहेत मात्र उमेदवार व प्रचारक टीका टीका करत असल्याने विकास कामाचे प्रश्न सुटणार कधी असा प्रश्न मतदारांना पडला आहे मात्र मतदार सुद्धा आज ना उद्या विकास होईल या आशेवर असल्याने पोलादपूर तालुक्याचा सर्वांगीण विकास खुंटला आहे.

Raigad ZP Election
Roha Zilla Parishad Election: रोहा तालुक्यात राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला शिवसेनेचे कडवे आव्हान; जिल्हा परिषद निवडणुकीत रंगत

तालुक्यातील 2 जिल्हा परिषद व 4 पंचायत समिती निवडणूक साठी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात युती तर विरोधात शिवसेना शिंदे गट व शेकाप उभी आहे तालुक्यातील 1 जिल्हा परिषद भाजप ला सोडण्यात आले तालुक्यातील अनेक उमेदवार याच्या कडून गाव भेट मतदारांना मार्गदर्शन करण्यात येत आहे दोन्ही प्रमुख पक्ष कडून सभेच्या माध्यमातून मतदारांना मतदान करण्याची व विजयाची हमी मागण्यात येत आहे मात्र ठोस प्रश्नांना बगल देत फक्त गेल्या काही वर्षात करण्यात आलेली कामे आम्हीच केली असल्याचे भासविण्यात येत आहे. मात्र तालुक्यातील जुन्या रस्त्यावर नव्याने डांबरीकरण ,सभामंडप ,अंतर्गत रस्ता ,कूपनलिका आदी काम करण्यात आले आहेत मात्र तालुक्यातील आरोग्य समस्यां सोडविण्याचे कार्य कोणत्याही लोकप्रतिनिधी द्वारे करण्यात आले नसल्याची खंत खासगीत व्यक्त केली जात आहे.

Raigad ZP Election
Pali Traffic Bypass Issue: पालीतील वाहतूक कोंडीवर 15 वर्षांचा बायपास केवळ कागदावरच; नागरिकांचा लोकप्रतिनिधींना जाब

चाकरमान्यांची भूमिका निर्णायक

चाकरमानी मतदार नेहमीच तालुक्यातील चित्र बदलत असल्याने त्याची भूमिका निर्णायक ठरत असल्याने फक्त सुट्टीत व इतर कार्यक्रम प्रसंगी येणारे चाकरमानी सुद्धा तालुक्यातील पाणी ,कचरा रोजगार या मूलभूत विकासात्मक प्रश्नावर सुद्धा मूग गिळून गप्प आहेत त्यातच पोलादपूर चा सर्वांगीण विकास झाला नसल्याने तालुक्यातील अनेक गावच गाव ओस पडलं चालले आहेत या कडे लोकप्रतिनिधी याचे दुर्लक्ष होत आहे त्याचं प्रमाणे आरोग्य व्यवस्था , दळणवळण ,शैक्षणिक या मुख्य विषयावर चर्चा व ठोस आश्वासन निवडणूक देण्यात येत नसल्याने तालुक्याचा विकास फक्त सभामंडप ,अंतर्गत रस्ता वर अडकून पडला आहे या वर फक्त सोशल मीडियावर चर्चा झोडण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news