Sindhudurg Accident : पोलिस कारच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

मालवण-कसाल मुख्य रस्त्यावरील घटना
Sindhudurg Accident
Sindhudurg Accident
Published on
Updated on

मालवण : मालवण-कसाल मुख्य रस्त्यावर सुकळवाड बाजारपेठ वरचानाका येथे पोलिसांची कार आणि दुचाकीमध्ये झालेल्या भीषण अपघातात सुकळवाड-भंडारवाडी येथील रहिवासी जगदीश तुकाराम मांजरेकर (४५) हा तरूण जागीच ठार झाला. ही घटना शुक्रवारी सायं. ७ वाजण्याच्या सुमारास घडली.

मांजरेकर यांच्या ताब्यातील हिरो डुएट दुचाकी आणि पोलिस कार बोलेरो यांच्यात अपघात झाल्याचे दिसून येताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. जगदीश याला उपचारासाठी रूग्णवाहिकेतून जिल्हा रूग्णालयात हलविण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी तो मयत असल्याचे स्पष्ट केले. अपघात स्थळी मोठया संख्येने स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते. पोलिसांची गाडी मालवण येथून ओरोसच्या दिशेने जात असताना जगदीश हा कामावरून घरी जाताना हा अपघात झाल्याचे बोलले जात होते.

पोलिसांच्याच गाडीची धडक बसून हा अपघात झाला. घटनास्थळी उपस्थित ग्रामस्थांनी याबाबत तीव्र संताप व्यक्त केला. जगदीश याच्या पश्चात आई, भाऊ असा परिवार आहे. जगदीश हा त्याच्या घरात एकुलता एक कमावता मुलगा होता. आई वयस्कर असून भाऊ आजारी असतो. त्यामुळे कुटुंबाला जगदीश आधार होता त्याच्या जाण्याने मांजरेकर कुटुंबीयांवर मोठा आघात झाला असून त्यांचा आधार हरपला आहे.सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news