Pitru Paksha 2026 : पितृपक्षात आजही श्राद्ध, तर्पणसह पिंडदानाला विशेष महत्त्व

धार्मिक विधींची तयारी सुरू; परंपरांमध्ये पूर्वजांविषयी श्रद्धा, कृतज्ञता व्यक्त करण्याची भावना केंद्रस्थानी
Pitru Paksha 2026
Pitru Paksha 2026pudhari photo
Published on: 
Updated on: 

पोलादपूर : हिंदू धर्मपरंपरेत पितृ पक्षाला विशेष महत्त्व आहे. आपल्या पूर्वजांचे स्मरण, त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणे तसेच त्यांच्या आत्मशांतीसाठी श्राद्ध, तर्पण आणि पिंडदान करण्याची परंपरा या काळात पाळली जाते. यंदा २७ सप्टेंबरपासून पितृ पक्षाला सुरुवात झाली असून १० ऑक्टोबर रोजी सर्वपित्री अमावस्येला पितृ पक्षाची सांगता होणार आहे. ग्रामीण भागात संपूर्ण कुटुंब एकत्र येत श्राद्ध, तर्पण करत असतात सद्यस्थितीत अनेक ठिकणी सर्वपित्री आमावस्या च्या दिवशी श्राद्ध करत आहेत.

पितृ पक्षातील प्रत्येक दिवसाला धार्मिकदृष्ट्या महत्त्व आहे. कुटुंबातील दिवंगत व्यक्तीच्या निधनाच्या तिथीनुसार त्या तिथीला श्राद्ध करण्याची परंपरा आहे. त्यामुळे अनेक कुटुंबांकडून आपल्या पूर्वजांच्या तिथीची माहिती घेऊन त्यानुसार श्राद्धविधीची तयारी केली जाते. पितृ पक्षात केल्या जाणाऱ्या विविध विधींमध्ये पिंडदानाला महत्त्वाचे स्थान आहे.

Pitru Paksha 2026
Karjat political conflict : कर्जतमध्ये महायुतीतील घटक पक्षांत कलगीतुरा

पारंपरिक पद्धतीनुसार तांदूळ, तीळ, तूप आदी पदार्थांचा वापर करून पिंड तयार केला जातो. पितरांचे स्मरण करून विधीपूर्वक पिंड अर्पण केला जातो. तसेच तर्पणामध्ये पाणी व तीळ अर्पण करून पूर्वजांचे स्मरण केले जाते.

अनेक कुटुंबांमध्ये या काळात ब्राह्मण भोजन, अन्नदान आणि गरजू व्यक्तींना मदत करण्याची परंपराही आहे. या सर्व परंपरांमध्ये पूर्वजांविषयी श्रद्धा आणि कृतज्ञता व्यक्त करण्याची भावना केंद्रस्थानी आहे.

Pitru Paksha 2026
Palghar health centre : कोटी रुपये खर्चून सूत्रकारचे आरोग्य केंद्र धूळखात

पितृ पक्षात आपल्या कुटुंबातील ज्या व्यक्तीचे निधन झाले आहे, त्यांच्या निधनाच्या तिथीनुसार श्राद्ध करण्याची प्रथा आहे. मृत्यूची तिथी माहीत नसल्यास किंवा संबंधित तिथीला श्राद्ध करणे शक्य झाले नसल्यास सर्वपित्री अमावस्येला श्राद्ध करण्याची परंपरा अनेक कुटुंबांमध्ये आढळते.

पितृ पक्षाच्या निमित्ताने अनेक कुटुंबांमध्ये घरगुती तसेच धार्मिक विधींची तयारी सुरू झाली आहे. श्राद्धविधी करताना स्थानिक पंचांगानुसार तिथी व वेळ निश्चित करून कुटुंबाच्या परंपरेनुसार विधी करण्याचे आवाहन धार्मिक जाणकारांकडून केले जाते.

सर्वपित्री अमावस्येचे विशेष

पितृ पक्षाचा शेवटचा दिवस म्हणजे सर्वपितृ अमावस्या. यंदा १० ऑक्टोबर २०२६ रोजी सर्वपितृ अमावस्या आहे. या दिवशी ज्ञात-अज्ञात पूर्वजांचे स्मरण करून श्राद्ध, तर्पण आणि दानधर्म करण्याची परंपरा आहे. पितृ पक्ष हा केवळ धार्मिक विधींचा काळ नसून आपल्या पूर्वजांच्या आठवणी जपण्याचा आणि त्यांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा काळ मानला जातो. पूर्वजांनी कुटुंबासाठी केलेले कष्ट, त्याग आणि संस्कार पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचे कार्यही या परंपरेतून होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news