Pen municipal waste collection : पेण न.प.हद्दीत दररोज उचलला जातोय 16 मेट्रिक टन कचरा

14 घंटा गाड्यामधून होतेय शहराची स्वच्छता; दररोज होतेय कंपोस्ट खत निर्मिती
Pen municipal waste collection
पेण न.प.हद्दीत दररोज उचलला जातोय 16 मेट्रिक टन कचराpudhari photo
Published on
Updated on

पेण ः कमलेश ठाकूर

पेण न.प. हद्दीत दररोज 16 मे. टन इतका कचरा संकलन केला जातो. त्यामध्ये 9.5 मे.टन ओला कचरा व 6.5 मे.टन सूका कचरा उचलला जातो. या कचरा गोळा करणे कामी न.प.कडे 12 घंटागाड्या व कंत्राटदाराच्या 2 नग अशा 14 घंटागाड्या उपलब्ध आहेत.

सदर घंटागाड्यांना ओला व सुका कचरा संकलन करणेकरीता स्वतंत्र व्यवस्था आहे. घरगुती घातक कचरा संकलन करणेकरीता वेगळी व्यवस्था उपलब्ध आहे. तसेच नागरीकांना ओला, सुका व घरगूती घातक कचरा वेगवेगळा देणेकरीता जनजागृती करण्यात येते. एकूणच दररोजच्या कचऱ्याची दररोज व्हिलेवाट लावली जाते.

Pen municipal waste collection
जालन्यात कचरा व्यवस्थापनाचा बोजवारा

12 घंटागाडी व्दारे 12 प्रभाग निहाय ओला व सुका कचरा संकलन केला जातो. सदर संकलित केलेला कचरा शहरातील विश्वेशर स्मशानभुमी येथील हायटेक ट्रान्सफर स्टेशन येथे वाहतूक केला जातो. सदर ठिकाणी ओला व सुका कचरा स्वतंत्ररीत्या काफम्पॅक्टर कॅप्सुलव्दारे घनता व आद्रता कमी करून घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प आंबेगाव येथे पुढील प्रक्रिया करणेकरीता वाहतुक केला जातो.

Pen municipal waste collection
Kolhapur news: 'कैद्यांचा शेत' परिसर बनला कचरा डंपिंग स्टेशन

घनकचरा व्यवस्थापनसाठी प्रकल्प 1मार्च 2017 रोजी 2. 53 कोटी रुपये खर्चे प्रस्तव मंजूर करून स्वच्छ भारत अभियान 1.0 (नागरी) अंतर्गत घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प नगरपरिषदेने राबविला आहे.

  • सदर प्रकल्पात घंटागाडी - 12 नग, स्क्रिनिंग मशीन (क्षमता 16 ) 01 नग,. सिंगल शाफ्ट श्रेडर मशीन (10 ) 01 नग, . जेसीबी - 01 नग, वे ब्रिज, ड्रेनेज वर्क, कचरा विभाग ऑफिस, वे ब्रिज रूम आय.ई.सी.अशा वस्तू सुविधाचा वापर दररोज होतो.

  • सदर प्रकल्पा अंतर्गत शिल्लक निधी मधून अजून अतिरीक्त 4 नग घंटागाडी शासनाच्या मान्यतेने खरेदी करण्यात आल्या व शासना मार्फत प्राप्त झालेला संपूर्ण निधी खर्च करण्यात आला आहे.

  • घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प अहवाला व्यतिरिक्त नगरपरिषद निधी जिल्हा वार्षिक योजना तसेच वैशिष्टयपूर्ण योजने अंतर्गत इतर मशीन खरेदी करण्यात आल्या आहेत. त्यात ऑरगॅनिक वेस्ट कंपोस्टींग मशीन 01 नग, इनसेनिरेटर मशीन 01 नग, प्लास्टीक क्रशर मशीन 01 नग,. लास्टीक बेलिंग मशीन (क्षमता 25) 01 नग,खरेदी केलेला आहे. जमा झालेल्या ओल्या कचऱ्यावर विन्ड्रो कंपोस्टींग व्दारे खत निर्मिती केली जाते.ही खत निर्मिती दररोज जवळजवळ पाचशे किलोच्या आसपास आहे. तयार झालेला खत नगरपालिकेने लावलेल्या रस्त्याच्या मधोमध झाडें लावण्याच्या कामी वापरला जातो.तसेच ऑरगॅनिक वेस्ट कंपोस्टींग मशीन व्दारेही खत निर्मिती केली जाते. स्क्रिनिंग मशीन व सिंगल शाफ्ट श्रेडर मशीनचा वापर केला जातो.

पेण शहरात निर्माण होणारा संपुर्ण कचरा 100 % संकलन करुन सदर कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात येते. प्रक्रिया होवू न शकणारा कचरा सिंपल लॅन्डफिल मध्ये टाकण्यात येतो. स्वच्छ भारत मिशन 2.0 अंतर्गत पेण शहराकरीता कंपोस्टींग शेड व सॅनिटरी लॅन्डफिल चे कामाचे आदेश देण्यात आलेले आहेत. तसेच जुन्या कचऱ्याचे बायोमायनिंग (20,000 ) करणे करीताही कामाचे आदेश देण्यात आलेले असून सदर बायोमायनिंगचे काम सुरू आहे.

जीवन पाटील, मुख्याधिकारी, पेण नगरपरिषद

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news