

कर्जत : जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या बुधवारी नामनिर्देशन दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस - उद्धव सेनेच्या परिवर्तन विकास आघाडीच्या उमेदवारांनी शक्ती प्रदर्शन करीत आपली नामनिर्देशन पत्र दाखल केली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवारांनीही आज नामनिर्देशन पत्र दाखल केली.
सकाळी अकराच्या सुमारास राष्ट्रवादी काँग्रेस संपर्क कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांसह कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे पुंडलिक पाटील, कार्याध्यक्ष अशोक भोपतराव, उद्धव सेनेचे जिल्हा उपप्रमुख नितीन सावंत, महिला जिल्हा प्रमुख सुवर्णा जोशी, उपगराध्यक्ष संतोष पाटील, जिल्हा उपाध्यक्ष एकनाथ धुळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दीपक श्रीखंडे, महिला विधानसभा अध्यक्ष ऍड. पूजा सुर्वे, महिला तालुकाध्यक्ष ऍड. रंजना धुळे, उद्धव सेना तालुका प्रमुख बाजीराव दळवी, महिला शहर प्रमुख मयुरी गजमल, मधुकर घारे आदींसह उमेदवार आणि कार्यकर्ते प्रशासकीय भवन मध्ये आले.
मनसेही रिंगणात
मनसे जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील यांच्या पत्नी प्रियांका पाटील यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले. याप्रसंगी माजी नगरसेवक हेमंत ठाणगे, प्रफुल्ल बनसोडे आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना जितेंद्र पाटील यांनी आमची शिंदे गटाशी तसेच परिवर्तन विकास आघाडी बरोबर बोलणी सुरु आहे. जे आम्हाला सन्मानजनक वागणूक देतील त्यांच्या बरोबर आण आम्ही जाऊ. अन्यथा स्वबळावर लढण्याचीही आमची तयारी आहे. असे पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
परिवर्तन विकास आघाडीच्या नारायण डामसे, बाबू घारे, सुनीता मोरे, उषा ठोंबरे, वर्षा दोरे -शेळके, नमिता घारे, चित्रा ठाकरे, कविता चंचे, नितीन धुळे, महेश खरे, भगवान चंचे, सुवर्णा ठाकरे, भारती घारे, सुवर्णा ठाकरे, भारती घारे, अक्षय तिटकारे आदी उमेदवारांनी आपली नामनिर्देशन पत्र दाखल केली. याप्रसंगी उत्तमं जाधव, प्रमोद देशमुख, प्रमोद पिंगळे, हृषीकेश राणे, जयेंद्र देशमुख, केतन बेलोसे, अरुण हरपुडे, अतुल कडू, प्रभावती लोभी, मनीषा पाटील, नंदा दुर्गे, वैशाली पाटील, साधना दुर्गे, आदी उपस्थित होते.