

रोहे ः जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी रोहे ज्येष्ठ नागरिक सभागृह येथे निवडणुकीचे अर्ज भरण्यास सर्वच राजकीय पक्षांनी गर्दी केली होती. रोहा तालुक्यात या निवडणुकीत राष्ट्रवादी ( अजित पवार गट ), शिवसेना ( शिंदे गट ), भाजप, शेतकरी कामगार पक्ष, शिवसेना ( उबाठा ), महाराष्ट्र नवनिर्माण सेना, व अपक्षाने उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. उमेदवारी अर्ज महायुती व महाविकास आघाडी यातील घटक पक्षाने दाखल केल्याने महायुती, महाविकास आघाडीचे चित्र अद्याप अस्पष्ट असल्याचे दिसून आले. त्यामुळे कोण कोणाच्या विरोधात लढणार हे अर्ज काढण्याच्या शेवटच्या दिवशी दिसून येईल.
रोहा तालुक्यातील प्रमुख राजकीय पक्षाच्या नाराज कार्यकर्त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरल्याने एकच खळबळ उडाली आहे. तालुक्यातील नेत्यांनी शक्ती प्रदर्शन करीत आज उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
रोहा तालुक्यातील नागोठणे जि.प.गटात 7, आंबेवाडी जि.प.गटात 6, भुवनेश्वर जि.प.गटात 13, घोसाळे जि.प. गटात 8 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. तर दुसरीकडे रोहा तालुक्यातील पंचायत समिती गणात दाखल झालेल्या अर्जामध्ये नागोठणे पं.स.गणात 7, सुकेळी पं.स.गणात 5, कोलाड पं.स.गणात 6, आंबेवाडी पं.स.गणात 9, धाटाव पं.स.गणात 7, भुवनेश्वर पं.स.गणात 7, न्हावे पं.स. गणात 11, घोसाळे पं.स.गणात 13 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहे.
सर्वपक्षीय उमेदवारांचे अर्ज
भुवनेश्वर गट ः राष्ट्रवादी मधुकर पाटील, शिवसेना ( उबाठा) नितीन वारंगे, शिवसेना ( शिंदे गट ) संदेश मोरे, शेकाप गणेश मढवी, अपक्ष अमित घाग,
नागोठणे गट ः राष्ट्रवादी किशोर जैन, शिवसेना ( शिंदे गट ) सुमीत काते, अपक्ष सोपान जांभेकर, मनसे साईनाथ धुळे, शेकाप रोशन पाटील,
आंबेवाडी गट - राष्ट्रवादी निधी जाधव, शिवसेना ( शिंदे गट ) सुनीता महाबळे, सीमा महाबळे, शेकाप प्रतिक्षा महाबळे, साक्षी घावटे, शिवसेना ( उबाठा) संज्योत पडवळ,
घोसाळे गट - भाजप सुश्रुता पाटील, राष्ट्रवादी रोहीणी सकपाळ, शिवसेना ( शिंदे गट) उर्वशी वाडकर, शिवसेना उबाठा संचिता फुलारे, शेकाप वैष्णवी ठाकुर, रुपाली मढवी,
नागोठणे गण ः राष्ट्रवादी संतोष कोळी, शिवसेना (उबाठा ) अंजली दुर्गावले, शिवसेना ( शिंदे गट ) कल्याणी घाग,शेकाप कांचन माळी,
सुकेळी गण ः राष्ट्रवादी नामी हंबीर,शेकाप गुलाब वाघमारे, भाजप योगीता शिद, शिवसेना (उबाठा) सुषमा वाघमारे, अरुणा हंबीर,
कोलाड गण ः राष्ट्रवादी जगन्नाथ धनावडे, शिवसेना ( शिंदे गट) शोभा सरफळे, शेकाप साक्षी घावटे, शिवसेना ( उबाठा ) कुलदिप सुतार,
आंबेवाडी गण ः राष्ट्रवादी संजय मांडलुसकर, शिवसेना (शिंदे गट) सुरेश महाबळे, शिवसेना ( उबाठा) कुलदिप सुतार, शेकाप मनोहर महाबळे, शिवराम महाबळे,
धाटाव गण ः राष्ट्रवादी विजया पाशीलकर, शिवसेना (उबाठा) सुप्रिया वारंगे, शेकाप दर्शना खरीवले, शिवसेना (शिंदे गट) स्वप्नाली मोरे,
भुवनेश्वर गण ः राष्ट्रवादी सुरेश मगर, शिवसेना (शिंदे गट) संतोष खेरटकर, शेकाप खेळु ढमाल, अपक्ष अमित घाग,
न्हावे गण ः राष्ट्रवादी शिवाणी म्हात्रे, शिवसेना (शिंदे गट) वर्षा देशमुख, शेकाप रूपाली मढवी,भाजप सिध्दीका धसाडे,
घोसाळे गण ः राष्ट्रवादी किरण मोरे, शिवसेना (उबाठा) सचिन फुलारे, शिवसेना (शिंदे गट) मनोहर गोरे, शेकाप विनायक धामणे, भाजप प्रकाश धुमाळ, अपक्ष श्रध्दा घाग,