पनवेल: अग्निशस्त्र विक्रीसाठी आलेल्या उत्तर प्रदेशातील तरुणाला अटक

 Panvel Police
Panvel Police

पनवेल: पुढारी वृत्तसेवा : पनवेल शहरात अग्निशस्त्र विकण्यासाठी आलेल्या २३ वर्षीय युवकाला पनवेल शहर पोलिसांनी सापळा रचून पनवेल रेल्वे स्थानक परिसरातील साई मंदिराजवळ अटक केली. त्याच्याकडून देशी बनावट जातीचे एक अग्निशस्त्र आणि दोन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. अंकीत सुरेश कुमार (वय २३, रा. उत्तरप्रदेश) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, एक अज्ञात व्यक्ती पनवेल शहरातील साई मंदिराजवळ अग्निशस्त्र विकण्यासाठी येणार असल्याची खात्रीलायक माहिती पनवेल शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक  विनोद लभडे यांना बातमीदाराकडून मिळाली होती. त्यानुसार, पोलीस उपनिरीक्षक विनोद लभडे आणि जयसिंह शिंदे यांची दोन विशेष पथके तयार केली. या पथकाने पनवेल रेल्वे स्थानक परिसरातील साई मंदिराजवळ सापळा रचला. यावेळी काळा टी शर्ट परिधान केलेली एक व्यक्ती या परिसरात आली. त्याने साध्या वेशातील पोलिसांना पहिल्यानंतर पनवेल रेल्वे स्थनाकाकडे पळ काढला. पोलिसांनी पाठलाग करून त्याला पकडले. त्याच्याकडील बॅगची तपासणी केली असता, त्यात बारा इंची बनावट जातीचे अग्नीशस्त्र आणि दोन जिवंत काडतुसे आढळून आली.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news