Panvel Wildlife Trafficking Case: पनवेलमध्ये बिबट्या आणि सशाचे अवयव जप्त; तिघांविरोधात गुन्हा

वनविभागाची मोठी कारवाई; दोन महिलांसह तिघांविरोधात वन्यजीव संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल
Panvel Wildlife Trafficking Case
Panvel Wildlife Trafficking CasePudhari
Published on: 
Updated on: 

खांदा कॉलनी: वन्यजीवांची अवैध शिकार आणि वन्यप्राण्यांच्या अवयवांची तस्करी रोखण्यासाठी वनविभागाने मोठी कारवाई केली आहे. वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने पनवेल परिसरात छापा टाकून सशाचे व बिबट्याचे अवयव जप्त केले आहेत. या प्रकरणी दोन महिलांसह तीघा संशयितांविरोधात वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

२६ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास डीआरआयचे वरिष्ठ गुप्तचर अधिकारी आणि सहाय्यक अधीक्षक यांच्या नेतृत्वाखालील पथकाने वनविभागाच्या संयुक्त सहकार्याने ही कारवाई केली.

Panvel Wildlife Trafficking Case
Mangao Water Shortage: रब्बी हंगाम धोक्यात आल्याने शेतीसमोर दुहेरी संकट; पाण्याअभावी लागवडीचे क्षेत्र निम्म्याहून अधिक घटले

या कारवाईदरम्यान संशयितांकडून सशाचे व बिबट्याचे अवयव हस्तगत करण्यात आले. जप्त केलेल्या मुद्देमालाची वनविभागाकडून नियमानुसार पंचनामा करून ताब्यात घेण्यात आला आहे. या प्रकरणी २७ नोव्हेंबर रोजी पनवेल वनपरिक्षेत्र कार्यालयात गुन्हा दाखल करण्यात आला.

वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ मधील कलम ९, ३९, ४८, ४९ व ५१ अन्वये तसेच वन्यजीव संरक्षण अधिनियमांतर्गत संबंधित तरतुदींनुसार कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणातील संशयितांमध्ये निकेश सांळुंखे (वय २०, रा. बदलापूर पूर्व), शांतिदेवी राजकुमार मिश्री (वय ५०, रा. पनवेल) आणि दीपिका राजकुमार मिश्री (वय २८, रा. पनवेल) यांचा समावेश आहे.

Panvel Wildlife Trafficking Case
Raigad News: हिरकणी बुरुजापासून बाजारपेठेच्या मागच्या बाजूपर्यंत तटबंदीची दुरुस्ती होणार; रायगड विकास प्राधिकरणाचा धोरणात्मक निर्णय

बिबट्या व ससा या वन्यप्राण्यांची शिकार करणे, त्यांच्या अवयवांची साठवणूक करणे किंवा त्यांची विक्री करणे हा गंभीर गुन्हा आहे. जप्त करण्यात आलेले अवयव कोणत्या उद्देशाने आणण्यात आले होते, त्यांची विक्री अथवा साठवणूक करण्यामागे कोणाचा सहभाग आहे, याचा सखोल तपास वनविभागाकडून सुरू आहे.

ही कारवाई वनपरिक्षेत्र अधिकारी पनवेल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पुढील तपासात वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी सहभागी आहेत. वन्यजीवांची शिकार किंवा त्यांच्या अवयवांची अवैध विक्री होत असल्याची माहिती नागरिकांना मिळाल्यास त्यांनी तातडीने वनविभाग किंवा पोलीस प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन वनविभागाने केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.