Panvel Water Supply Shutdown : जलवाहिन्यांच्या दुरुस्तीमुळे पनवेल शहराचा पाणीपुरवठा ३६ तास राहणार बंद

भोकरपाड्यातील मजीप्राच्या केंद्रात काम युद्धपातळीवर; दोन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता
Panvel Water Supply Shutdown
Panvel Water Supply Shutdownpudhari photo
Published on: 
Updated on: 

खांदा कॉलनी : राजेश डांगळे

पनवेल शहराचा पाणीपुरवठा तब्बल ३६ तास बंद राहणार असल्याने पनवेलकरांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून करण्यात येणाऱ्या जलवाहिनीच्या दुरुस्तीच्या कामामुळे मंगळवार, १७ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजल्यापासून बुधवार, १८ नोव्हेंबर रोजी रात्री ९ वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला आहे.

या पार्श्वभूमीवर मुंबई-पुणे जुन्या महामार्गावरील भोकरपाडा येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या केंद्रात जलवाहिनीच्या कामाला युद्धपातळीवर सुरुवात करण्यात आली आहे.पनवेल शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या महत्त्वाच्या जलवाहिन्यांशी संबंधित काम सध्या भोकरपाडा येथे सुरू आहे.

Panvel Water Supply Shutdown
Weather Impact on Health : बदलत्या वातावरणामुळे साथीच्या आजारांचा वाढतोय विळखा

हे काम वेळेत पूर्ण करण्यासाठी संबंधित यंत्रणेकडून विशेष दक्षता घेतली जात आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी स्वतः कामाच्या ठिकाणी उपस्थित राहून संपूर्ण कामावर लक्ष ठेवत आहेत. कामामध्ये कोणतीही दिरंगाई होऊ नये, यासाठी अधिकारी आणि कर्मचारी प्रत्यक्ष घटनास्थळी थांबून काम करून घेत आहेत.

उद्यापर्यंत म्हणजेच बुधवारपर्यंत हे काम पूर्ण होईल, अशी माहिती पुढे येत आहे. मात्र, काम पूर्ण झाल्यानंतरही पाणीपुरवठा पूर्ववत होण्यास काही कालावधी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे पनवेल शहरातील नागरिकांना पुढील दोन ते तीन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता महानगरपालिकेने व्यक्त केली आहे.

Panvel Water Supply Shutdown
Jaggery Sesame Benefits Winter: हिवाळ्यात गूळ आणि तीळ का खावे?

महानगरपालिकेने नागरिकांना पाणीपुरवठा बंद राहण्यापूर्वी आवश्यक तेवढा पाण्याचा साठा करून ठेवण्याचे आवाहन केले आहे. तसेच उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करावा आणि पाण्याचा अपव्यय टाळावा, असेही सूचित करण्यात आले आहे.

गृहिणी, हॉटेल व्यावसायिकांना फटका

३६ तास पाणीपुरवठा बंद राहणार असल्याने गृहिणी, नोकरदार वर्ग, व्यावसायिक तसेच हॉटेल व्यावसायिकांना याचा फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे भोकरपाडा येथील काम लवकरात लवकर पूर्ण होऊन पनवेलकरांना नियमित पाणीपुरवठा सुरू व्हावा, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे. जलवाहिनीचे काम पूर्ण झाल्यानंतर पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी संबंधित यंत्रणेला आणखी प्रयत्न करावे लागणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून पाण्याचा जपून वापर करणे आवश्यक आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.