पनवेल : कामोठे येथे अश्लिल मेसेजची तक्रार केल्याच्या रागातून शिक्षिकेला मारहाण

पनवेल : कामोठे येथे अश्लिल मेसेजची तक्रार केल्याच्या रागातून शिक्षिकेला मारहाण

पनवेल, पुढारी वृत्तसेवा: अश्लील मेसेज करत असल्याची तक्रार केल्याच्या रागातून एका शिक्षिकेला मारहाण केल्याचा प्रकार  नवी मुंबई परिसरातील कामोठे येथे घडला आहे. संबंधित महिला कामोठे येथे राहात असून ती व्यवसायाने शिक्षिका आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, 22 वर्षे भावाचे निधन झाल्यानंतर आई-वडिलांची काळजी घेता यावी, म्हणून आई वडील रहात असलेल्या इमारतीत संबंधित महिला भाड्याने राहण्यासाठी आली. मात्र, त्याच इमारतीत राहणारा सनी कलमात कांडी वासू ( वय 40) याने त्या महिलेवर वाईट नजर ठेवण्यास सुरुवात केली. व तो संबंधित महिलेला अश्लील मेसेज व ती महिला दिसली की वारंवार अश्लील हावभाव देखील करत असे, यामुळे संबंधित महिला घाबरून गेली. तिने हा प्रकार तिचे पती व आई-वडील यांना सांगितला.

त्यानंतर हा प्रकार सनी याच्या वडिलांना देखील कळविण्यात आला. यामुळे आपली बदनामी झाली. यामुळे संबंधित महिलेवर सनी याचा राग होता. त्यामुळे तो काही ना काही कारण काढून महिलेशी भांडण करीत असे. शनिवारी (दि. 21) सनी वासू हा संबंधित महिलेच्या घरी आला व जोरजोरात दार वाजवू लागला. यावेळी पीडित महिला व तिची बारा वर्षांची मुलगी घरात होती. यावेळी सनी याने संबंधित महिलेला जबर मारहाण केली. याप्रकरणी कामोठे पोलीस ठाण्यात सनी विरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे. तर संबंधित महिलेवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news