Panvel Taloja water supply shutdown|तळोजा नोडचा पाणीपुरवठा ३६ तास ठप्प, यादिवशी पाणीपुरवठा विस्कळीत

नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे सिडकोकडून आवाहन
Panvel Taloja water supply shutdown
Panvel Taloja water supply shutdown
Published on: 
Updated on: 

पनवेल : कमी पर्जन्यमान आणि एल निनोच्या प्रभावामुळे उपलब्ध जलस्रोतांचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून (एमआयडीसी) तळोजा नोडचा पाणीपुरवठा ३६ तासांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. गुरुवार, २२ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री १२ वाजल्यापासून शनिवार, २४ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत ही पाणीपुरवठा बंदची कालावधी राहणार आहे.

या निर्णयामुळे शुक्रवार, २३ ऑक्टोबर आणि शनिवार, २४ ऑक्टोबर रोजी तळोजा नोडमधील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. उपलब्ध पाणीसाठ्याचे योग्य नियोजन करून ऑगस्ट २०२७ पर्यंत जलस्रोतांचे व्यवस्थापन करण्याच्या उद्देशाने ही खबरदारी घेण्यात येत असल्याचे एमआयडीसीकडून कळविण्यात आले आहे.

सिडको प्रशासनाने यासंदर्भात नागरिकांना सूचना दिल्या आहेत. पाणीपुरवठा बंद राहण्याच्या कालावधीचा विचार करून आवश्यक तेवढा पाणीसाठा आधीच करून ठेवावा, तसेच उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन केले आहे. पाणीपुरवठा पूर्ववत होईपर्यंत नागरिकांनी पाण्याचा अपव्यय टाळून सहकार्य करावे, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Panvel Taloja water supply shutdown
Panvel Crime | पनवेल पोलिसांची मोठी कामगिरी; १.२२ कोटींचा मुद्देमाल मूळ मालकांना परत

पाणीपुरवठा बंद राहणार असल्याने तळोजा नोडमधील रहिवासी, सोसायट्या आणि व्यावसायिक आस्थापनांनी पाण्याचे नियोजन करणे आवश्यक आहे. या कालावधीत होणाऱ्या गैरसोयीबद्दल सिडको प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली आहे.

Panvel Taloja water supply shutdown
Panvel Municipal Transport Service : पनवेल मनपा स्वतःची परिवहन सेवा सुरू करणार

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news