Panvel voter list revision : पनवेलमध्ये लाखांवरती मतदारांच्या नावांत बदल

२७ हजार जणांना नोटिसा; एसआयआरच्या सुनावणीसाठी नागरिकांची धावपळ
Panvel voter list revision
Panvel voter list revision(छायाचित्र- राजेश डांगळे)
Published on: 
Updated on: 

खांदा कॉलनी : पनवेल विधानसभा मतदारसंघातील मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणामुळे (एसआयआर) मतदारांची चांगलीच धावपळ उडाली आहे. सुमारे दीड लाख मतदारांच्या नोंदींमध्ये बदल अथवा दुरुस्तीची आवश्यकता निर्माण झाल्याचे सांगितले जात असून, त्यापैकी सुमारे २७ हजार मतदारांना सुनावणीसाठी नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. संबंधित कागदपत्रे घेऊन सुनावणी केंद्रांवर पोहोचणाऱ्या मतदारांची संख्या वाढली आहे.

सकाळपासूनच विविध केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्याचे चित्र दिसत आहे. लहान मुलांना सोबत घेऊन आलेले पालक, ज्येष्ठ नागरिक तसेच मतदार यादीत आपले नाव कायम राहावे किंवा नवीन नाव समाविष्ट व्हावे यासाठी धावपळ करणारे तरुण मोठ्या संख्येने केंद्रांवर उपस्थित राहत आहेत. ‘मतदान करण्यासाठी एवढा त्रास कधी झाला नव्हता; आता मतदान यादीत नाव असल्याचे सिद्ध करण्यासाठीच वेळ खर्च करावा लागत आहे,’ अशी भावना काही मतदारांनी व्यक्त केली.

Panvel voter list revision
MPSC च्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा: 2025 पासूनच नवा अभ्यासक्रम लागू होणार, राज्य सरकारचा निर्णय

जुन्या मतदार यादीतील नोंदींमध्ये तफावत आढळल्यास संबंधित मतदारांकडून कागदपत्रे मागवली जात आहेत. सुनावणीसाठी उपस्थित राहून कागदपत्रे सादर करावी लागत असल्याने नागरिकांची तारांबळ उडाली आहे.

मतदारांनी काय करावे?

नोटीस मिळालेल्या मतदारांनी घाबरून न जाता नोटिशीत नमूद केलेल्या मुदतीत संबंधित केंद्रावर उपस्थित राहावे. आवश्यक कागदपत्रे सोबत ठेवावीत. मतदारांनी आपले नाव प्रारूप मतदार यादीत तपासावे आणि नाव, पत्ता किंवा इतर तपशीलात दुरुस्ती असल्यास संबंधित अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी. महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या संकेतस्थळावर एसआयआरसाठी मतदारांना नाव तपासण्याची आणि आवश्यक अर्जांची सुविधा उपलब्ध आहे.

Panvel voter list revision
Pregnancy Tips : गर्भारकाळात आईस्क्रीम खावे का? जाणून घ्या आई आणि बाळाच्या आरोग्याशी संबंधित महत्त्वाचे तथ्य

प्रक्रिया सोपी करण्याची गरज

एसआयआरचा उद्देश मतदार यादी अधिक अचूक आणि अद्ययावत करणे हा असला, तरी प्रत्यक्ष प्रक्रियेत सामान्य मतदाराला कागदपत्रे, रांगा यांचा सामना करावा लागत असल्याने नागरिकांना अधिक सुलभ सुविधा करून द्याव्यात, अशी मागणी होत आहे.

  • निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील दावे व हरकती दाखल करण्याची मुदत १२ ऑक्टोबरपर्यंत वाढवली असून, नोटिसांवरील कार्यवाहीची मुदत १० नोव्हेंबरपर्यंत करण्यात आली आहे. अंतिम मतदार यादी १६ नोव्हेंबरला प्रसिद्ध होणार असल्याची ताजी माहिती आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news