Pregnancy Tips : गर्भारकाळात आईस्क्रीम खावे का? जाणून घ्या आई आणि बाळाच्या आरोग्याशी संबंधित महत्त्वाचे तथ्य

संसर्गाचा धोका टाळण्यासाठी महिलांनी घ्यायची काळजी
Pregnancy Tips
Pregnancy Tips
Published on
Updated on

गर्भावस्थेच्या काळात अनेक महिलांना काही विशिष्ट पदार्थ खाण्याची तीव्र इच्छा होते, ज्याला आपण ‘क्रेव्हिंग’ म्हणतो. यामध्ये आईस्क्रीमचा क्रमांक बराच वरचा असतो; पण आईस्क्रीम खाणे सुरक्षित आहे की नाही, असा प्रश्न प्रत्येकीच्या मनात असतो. याचे थेट उत्तर 'नाही' असे आहे.

आईस्क्रीम खायचेच असेल, तर पाश्चराईज्ड दुधापासून बनलेले आहे की नाही, हे तपासणे सर्वाधिक महत्त्वाचे आहे. अनपाश्चराईज्ड दुग्धजन्य पदार्थांमध्ये ‘लिस्टेरिया'सारखे घातक जीवाणू असण्याची शक्यता असते. यामुळे संसर्गाचा धोका वाढू शकतो. त्यामुळे नेहमी नामांकित ब्रँडचे आणि लेबल तपासलेले आईस्क्रीम निवडणे हिताचे ठरते. उघड्यावर मिळणारे आईस्क्रीम कटाक्षाने टाळावे.

गर्भावस्थेत आहाराचा समतोल राखणे गरजेचे असते. आईस्क्रीममध्ये साखरेचे प्रमाण अधिक असल्याने त्याचे अतिसेवन वजन वाढवू शकते किंवा ‘जेस्टेशनल डायबिटीस’चा धोका निर्माण करू शकते.

तुम्हाला घशाचा त्रास किंवा अ‍ॅसिडिटीची समस्या असेल, तर थंड पदार्थांचे सेवन जपूनच करावे. घरगुती आईस्क्रीम बनवतानाही घटक पदार्थ पाश्चराईज्ड असावेत याची दक्षता घ्यावी. थोडक्यात, योग्य निवड, मर्यादित प्रमाण आणि स्वच्छतेची काळजी घेतल्यास आईस्क्रीमचा आनंद घेऊ शकता; पण तोही मर्यादितच असायला हवा. वर्ज्य करणे सर्वांत ईष्ट!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news