पनवेल रेल्वे स्थानकात लिफ्ट बंद; चार प्रवासी तासभर अडकले, सुखरूप सुटका

Raigad news | अचानक लिफ्ट थांबल्याने आत अडकलेल्या प्रवाशांमध्ये घबराट निर्माण झाली
Raigad news
Raigad news
Published on
Updated on

विक्रम बाबर

पनवेल : पनवेल रेल्वे स्थानकावर सकाळी ७ वाजण्याचा सुमारस आज एक धक्कादायक घटना घडली. प्लॅटफॉर्म क्रमांक ६ आणि ७ दरम्यान असलेली प्रवासी लिफ्ट अचानक बंद पडल्याने चार प्रवासी त्यामध्ये अडकून पडले. या घटनेमुळे स्थानकावर काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

Raigad news
Parbhani Crime : परभणी रेल्वे स्थानकावर लिफ्टचे लॉक फोडून सीसीटीव्हीची तोडफोड, कर्मचाऱ्यावर हल्ला

मिळालेल्या माहितीनुसार, प्लॅटफॉर्म क्रमांक ६ आणि ७ येथे असलेली प्रवासी लिफ्ट आज सकाळी ७ वाजून ७ मिनिटे लिफ्ट बंद पडली त्या वेळी त्यामध्ये एक डॉक्टर, एक महिला प्रवासी आणि आरपीएफचे दोन कर्मचारी उपस्थित होते. अचानक लिफ्ट थांबल्याने आत अडकलेल्या प्रवाशांमध्ये घबराट निर्माण झाली.

Raigad news
Leopard Rescue In Satpur | ड्रोनने शोधला मार्ग अन् डार्टने केला बेशुद्ध! शिवाजीनगरमध्ये बिबट्याला पकडण्यासाठी हायटेक मोहीम

घटनेची माहिती मिळताच रेल्वे प्रशासनाने तत्काळ हालचाली करत बचावकार्य सुरू केले. मात्र काही केल्याने लिफ्ट सुरू झाली नाही , रेल्वे चे कर्मचारी तसेच लिफ्ट चे टेक्निशियन आल्यानंतर सुमारे एक तासाच्या प्रयत्नांनंतर अखेर आठ वाजण्याचा आसपास लिफ्टचे दरवाजे उघडण्यात यश आले आणि सर्व प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा जखमी झाल्याची नोंद नाही. मात्र, या घटनेमुळे स्थानकावरील प्रवाशांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण पसरले होते.

Raigad news
Parbhani Crime : परभणी रेल्वे स्थानकावर लिफ्टचे लॉक फोडून सीसीटीव्हीची तोडफोड, कर्मचाऱ्यावर हल्ला

पनवेल रेल्वे स्थानकावर सध्या मोठ्या प्रमाणात विस्तारीकरणाची कामे सुरू आहेत. नवीन प्लॅटफॉर्म उभारणी, सरकते जिने (एस्केलेटर) बसविणे आदी कामे युद्धपातळीवर सुरू असताना अशा प्रकारची घटना घडल्याने रेल्वे प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

Raigad news
Chhatrapati Sambhajinagar Crime : कामावरून काढल्याच्या रागातून वेटरला भोसकले; दोघे पोलिसांच्या ताब्यात

प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने लिफ्ट आणि इतर सुविधा नियमितपणे तपासल्या जाव्यात, अशी मागणी प्रवासी वर्गाकडून करण्यात येत आहे. या घटनेनंतर रेल्वे प्रशासनाने लिफ्टच्या तांत्रिक बिघाडाची चौकशी सुरू केली असून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जातील, असे आश्वासन देण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news