Panvel Monsoon Plan: पनवेल मनपाला लागले पावसाळ्याचे वेध

पावसाळ्यातील आपत्कालीन परिस्थितीसाठी आढावा बैठक
Panvel Monsoon Plan
Panvel Monsoon PlanPudhari
Published on
Updated on

पनवेल: आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर संभाव्य आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी पनवेल महानगरपालिकेकडून व्यापक नियोजन करण्यात आले आहे. यासंदर्भात आयोजित नियोजन बैठक आज आयुक्त मंगेश चितळे यांच्या अध्यक्षतेखाली मुख्यालयात घेण्यात आली. यावेळी विविध विभागांना तत्काळ उपाययोजना राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या. सर्व विभागांमध्ये समन्वय राखून कार्यवाही करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले.

यावेळी अतिरीक्त आयुक्त गणेश शेटे, पोलिस उपायुक्त तिरूपती काकडे, परिवहन व्यवस्थापक कैलास गावडे, शहर अभियंता संजय कटेकर, मुख्य वैद्यकिय अधिकारी डॉ. आनंद गोसावी , उपअभियंता विलास चव्हाण, चारही प्रभागाचे प्रभाग अधिकारी ,वृक्ष प्राधिकरण विभाग प्रमुख संदिप पवार, पोलिस विभागाचे चारही प्रभागातील वरिष्ठ पोलिस निरीक्षक, वाहतूक पोलिस, पालिका अधिकारी, सिडको अधिकारी, आयआरबी प्रतिनिधी, उपस्थित होते.

Panvel Monsoon Plan
RTE Admission: आरटीई प्रवेश निश्चितीसाठी 8 मेपर्यंत अंतिम संधी

महापालिका क्षेत्रातील पाणी साचणाऱ्या ठिकाणांची आढावा घेऊन तेथे त्वरित उपाययोजना करण्याचे निर्देश यावेळी आयुक्तांनी दिले. फायर ब्रिगेड यंत्रणा सज्ज ठेवण्याबरोबरच,धोकादायक इमारती रिकाम्या करण्याच्यादृष्टीने सिडको,एमएसीबी यांनी सहकार्य करण्याच्या सूचना या बैठकीत देण्यात आल्या. तसेच धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण करून त्याची माहिती पोलिस विभागाला देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

पावसाळ्यात पांडवकडा भागात पोलिस बंदोबस्त करण्याबाबत करण्याविषयी आयुक्तांनी पोलिस विभागास सांगितले. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवरती एसटीपी प्लॅन्टमधील पंप सुरू ठेवावेत, त्यांची तातडीने दुरूस्ती करून ठेवण्याबाबत आयुक्तांनी सिडको अधिकाऱ्यांना सूचित केले.

याचबरोबर बस स्टॅन्डसमोरील हायवेवरील रस्त्यावर पडणारे पाण्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावण्याबाबत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ व आयआरबी यांना आयुक्तांनी सूचित केले. याचप्रमाणे रस्त्यांकडील होर्डिंग्जचे स्ट्रक्चरल ऑडीट करून महापालिकेस कळविण्यासंबधितआयुक्तांनी सूचना दिल्या.

Panvel Monsoon Plan
Traffic Congestion: दिघा गाव रेल्वे स्थानकासमोरील चौकात वाहतूक कोंडी

महापालिका कार्यक्षेत्रातील आत्तापर्यंत झालेल्या नालेसफाईच्या कामाचा आढावा घेऊन उर्वरीत लहान मोठ्या सर्व नालेसफाईची कामे 20 मेपर्यंत पुर्ण करण्याबाबत आयुक्तांनी आरोग्य विभागास सूचना दिल्या. पावसाळ्यात साथीचे रोग रोखण्यासाठी धूर व जंतुनाशक फवारणी यंत्रणा तयार ठेवण्याचे निर्देश आरोग्य विभागाला देण्यात आले आहेत. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवरती साथरोगासारखे विकार उद्भवल्यास तयारीच्या दृष्टीने औषधसाठा व इतर वैद्यकिय सेवासुविधांची पुर्तता करण्याबाबत वैद्यकिय आरोग्य विभागास आयुक्तांनी सांगितले.

शहरातील सर्व वॉर्ड अधिकाऱ्यांना आपत्कालीन साहित्य व यंत्रणा सज्ज ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नवीन पनवेल व इतर भागातील अंडरपासमध्ये पाणी साचण्याच्या समस्या दूर करण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्यात येणार आहेत.

पांडवकडा परिसरात पोलीस तैनात

खारघर परिसरात पांडवकडा भागात पावसाळी पर्यटनासाठी हजारो पर्यटक येत असतात.काही उत्साही पर्यटकांमुळे यापूर्वी अनेकदा दुर्घटनाघडलेल्या आहेत.त्या घटना टाळण्यासाठी खारघर परिसरात पोलिस बंदोबस्त केला जावा,अशा सूचनाही यावेळी करण्यात आल्या.

तात्पुरते निवारा केंद्रे

पूरस्थिती उद्भवल्यास गाढी नदी परिसरातील नागरिकांसाठी तात्पुरते निवारा (ट्रान्झिट कॅम्प) उभारण्याची तयारी करणे व त्या अनुषंगाने सर्व तयारी करण्याचे आदेश देण्यात आले आहे. तसेच शहरातील सर्व नाले वेळेत साफ करण्याच्या सूचना संबधित विभागाला देण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news