RTE Admission: आरटीई प्रवेश निश्चितीसाठी 8 मेपर्यंत अंतिम संधी

पालकांनी आपल्या पाल्याचे कागदपत्रे पडताळणी करून पाल्याचा प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन शिक्षणाधिकारी (प्राथमिक) ललिता दहीतुले यांनी केले आहे.
RTE Admission
RTE Admissionpudhari photo
Published on
Updated on

अलिबाग: बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 नुसार दुर्बल व वंचित घटकाकरीता 25 टक्के ऑनलाईन प्रवेश सन 2026-27 प्रक्रियेदरम्यान सोडतद्वारे निवड झालेल्या विद्यार्थ्यांना कागदपत्रे पडताळणी व आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी शुक्रवार (8 मे) पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

प्रवेश निश्चितीसाठी ही अंतिम मुदतवाढ असल्यामुळे पालकांनी आपल्या पाल्यांची कागदपत्रे तातडीने पडताळणी करून प्रवेश निश्चित करावा, आवाहन रायगड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातर्फे करण्यात आले आहे.

RTE Admission
Encroachment Removal: जीएमसमोरील सर्व अतिक्रमणे जमीनदोस्त

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009मधील कलम 12 (सी) (1) नुसार दुर्बल व वंचित घटकांतील बालकांना स्वयं अर्थसहाय्यित शाळा, विना अनुदानित शाळा या शाळांमध्ये आरटीई 25 टक्के सन 2026-27 या वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येत आहे.

RTE Admission
Mumbai Lake Water Level: तलाव आटू लागले! साठा 25 टक्क्यांवर

सोडतीद्वारे निवड झालेल्या विद्याथ्र्यांना आपल्या कागदपत्रांची पडताळणी करण्याठी व आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी 30 एप्रिलपर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र आता 8 मेपर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे ज्या पालकांनी आपल्या पाल्याचे कागदपत्रे पडताळणी करून पाल्याचा प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन शिक्षणाधिकारी (प्राथमिक) ललिता दहीतुले यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news