Panvel Migratory Birds: वडाळे तलावावर स्थलांतरित पक्ष्यांची वर्दळ; निसर्गप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण

हजारो किमी प्रवास करून बदकांचे आगमन; प्रदूषणामुळे अधिवास धोक्यात येण्याची भीती
Panvel Migratory Birds
Panvel Migratory BirdsPudhari
Published on
Updated on

पनवेल : शहरालगतच्या पेशवे कालीन वडाळे तलावात हिवाळ्याच्या दिवसांत स्थलांतरित पक्ष्यांचे आगमन झाले असून निसर्गप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे. यंदाही हजारो किलोमीटरचा प्रवास करून या बदकांनी तलाव परिसर गजबजून टाकला आहे.

Panvel Migratory Birds
Karjat Project Protest: कर्जतमधील प्रकल्पामुळे आदिवासी, स्थानिक संस्कृती नष्ट होणार

तलावातील पाणवनस्पतींमध्ये थव्याने वावरत असलेली ही बदके नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहेत.पहाटे व संध्याकाळी त्यांचा वावर अधिक दिसून येत असल्याने पक्षी निरीक्षकांसाठी हा परिसर आकर्षणाचे केंद्र ठरत आहे.

Panvel Migratory Birds
Raigad Forest Fire | देऊळकोंड येथे वनव्याचा तडाखा; महावितरणच्या केबल, यंत्रणांचे मोठे नुकसान

दरवर्षीप्रमाणे यंदाही या पक्ष्यांचे आगमन हे पर्यावरण संतुलनाचे सकारात्मक संकेत मानले जात आहेत. मात्र तलावातील वाढते प्रदूषण आणि मानवी हस्तक्षेप यामुळे त्यांच्या अधिवासावर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे या ऐतिहासिक वडाळे तलावाचे संवर्धन आणि स्वच्छता राखण्याची गरज स्थानिकांकडून व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news