Panvel Crime : दोघांना एमडी ड्रग्जसह अटक; पनवेलमध्ये खळबळ

करंजाडे येथे पोलिसांची कारवाई
Panvel MD Drug Case
Panvel MD Drug Casepudhari photo
Published on: 
Updated on: 

पनवेल : बेकायदा मेफेड्रॉन (एमडी) या अंमली पदार्थाच्या विक्री प्रकरणात पनवेल शहर पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. जितीन हरीश शेट्टी (वय २५, रा. तक्का गाव, पनवेल) आणि राज अजयकुमार मिश्रा (वय २३, रा. एचओसी कॉलनी, पनवेल) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.पनवेल शहर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

करंजाडे परिसरात एमडी सदृश्य अंमली पदार्थ विक्रीच्या उद्देशाने बाळगल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. या कारवाईत पोलिसांनी ९.३४ ग्रॅम वजनाचा एमडी सदृश्य पदार्थ, दोन मोबाईल फोन आणि एक स्कूटर असा एकूण १ लाख ४८ हजार २० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणातील रोशन पवार आणि उमंग गुप्ता या अन्य दोघांचा शोध सुरू असल्याची माहिती पनवेल शहर पोलिसांनी दिली आहे.

Panvel MD Drug Case
Navi Mumbai Airport New Flights : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून ९ नवीन देशांतर्गत हवाई मार्ग सुरू

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २२ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री १२.४५ च्या सुमारास करंजाडे येथील कॉलेज फाटा ते चिंचपाडा पुलाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील नाल्याजवळ ही कारवाई वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाळा कुंभार यांच्या मार्गदर्शना खाली करण्यात आली. दोन्ही आरोपींकडे विक्रीच्या उद्देशाने मेफेड्रॉन सदृश्य अंमली पदार्थ बेकायदेशीररीत्या बाळगलेला आढळल्याचा आरोप आहे.

Panvel MD Drug Case
Ex Navy Agniveers Join Police Force : ७२० किमीच्या किनारपट्टीच्या सुरक्षेला भक्कम आधार

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news