Karvanda: पनवेलच्या बाजारात डोंगरची काळी मैना दाखल

चवीसोबतच औषधी गुणधर्मांमुळे करवंदांना मोठी मागणी
Karvanda
KarvandaPudhari
Published on
Updated on

पनवेल: उन्हाळ्याच्या सुट्ट्या आणि डोंगररांगांमध्ये मिळणाऱ्या रानमेव्याचा अनोखा संगम सध्या पनवेलच्या भाजी मार्केटमध्ये पाहायला मिळत आहे. डोंगराची काळी मैना म्हणून ओळखली जाणारी काळी करवंदं सध्या बाजारात दाखल झाली असून, कडाक्याच्या उन्हातही ही खरेदी करण्यासाठी ग्राहकांची मोठी उत्सुकता आणि गर्दी दिसून येत आहे.

कोंबडा की कोंबडीच्या आठवणींना उजाळा

काळी पिकलेली करवंदे पाहताच अनेक ग्राहकांच्या बालपणीच्या आठवणी ताज्या होत आहेत. लहानपणी करवंदे हातात धरून “कोंबडा की कोंबडी“ असा खेळ खेळत ही करवंदं खाण्याचा आनंद आजही अनेकांच्या मनात घर करून आहे. आज याच आठवणींना उजाळा देत अनेक पनवेलकर खास करून ही काळी करवंद शोधण्यासाठी बाजारात येत आहेत.

Karvanda
Raigad Rain Alert: रायगड जिल्ह्यात 21 एप्रिलला वादळी पावसाचा इशारा; आंबा, काजू बागायतदारांना तातडीच्या काढणीचे आवाहन

आरोग्यासाठी सुपरफूड: करवंदांचे औषधी गुणधर्म

काळी केवळ चवीसाठीच नव्हे, तर आरोग्याच्या दृष्टीनेही ही काळी करवंदे अत्यंत उपयुक्त मानली जातात. करवंदांमध्ये अनेक नैसर्गिक औषधी गुणधर्म आढळतात.करवंदामध्ये मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन सी असते, ज्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. कच्च्या हिरव्या करवंदाची भाजी किंवा पिकलेली करवंदं खाल्ल्याने पोटाचे विकार दूर होतात आणि भूक वाढण्यास मदत होते.

रक्ताल्पता (अनिमीया) असलेल्या रुग्णांसाठी करवंदं गुणकारी मानली जातात, कारण यात लोहाचे प्रमाण भरपूर असते.रक्ताभिसरण सुरळीत ठेवण्यासाठी आणि उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी देखील करवंदे फायदेशीर ठरतात.

Karvanda
Managaon Theatre: माणगावमधील नाट्यरसिकांच्या आशेवर निराशेचे पाणी; सांस्कृतिक चळवळ उभारणीला खीळ

गगनाला भिडले भाव

एकूणच रानातून येणाऱ्या उन्हाळी फळे व भाज्यांची उपलब्धता यंदा काही प्रमाणात कमी असल्याने, स्वाभावीकच मागणी वाढती आहे. त्यामुळे यंदा या करवंदाचे दर गगनाला भिडले आहेत. पनवेल भाजी मार्केटमध्ये सध्या सुमारे 200 रुपये पाव किलो या दराने ही करवंदे विकली जात आहे. आदिवासी बांधवांकडून येणारी करवंदे वाट्यावर विकली जात आहेत.

ही करवंदे अत्यंत अल्प काळासाठी बाजारात उपलब्ध असल्याने ग्राहक चढ्या दरानेही ती खरेदी करण्यास पसंती देत आहेत. शहराच्या काँक्रीटच्या जंगलात राहणाऱ्या पनवेलकरांसाठी या रानभाज्या व करवंदांच्या निमित्ताने पारंपारिक चवीचा आणि आरोग्यदायी रानमेव्याचा मनसोक्त आनंद घेण्याची संधी मात्र चालून आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news