Kamothe Slab Collapse: झोपेत असताना बेडरूममधील स्लॅब कोसळला; पनवेलमध्ये तरुणाचा मृत्यू

Kamothe Latest News: १२ वर्षीय मुलगी जखमी; इमारतीच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह
Kamothe Slab Collapse Youth Death
सुरेश लोखंडेPudhari
Published on
Updated on

Kamothe Slab Collapse Youth Death

पनवेल: कामोठे सेक्टर-१० येथील साई सिद्धी सोसायटीमध्ये बुधवारी (दि.१) पहाटे घडलेल्या दुर्दैवी घटनेत घरातील बेडरूमचा स्लॅब कोसळून ३९ वर्षीय सुरेश लोखंडे यांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत त्यांची १२ वर्षीय मुलगी वेदिका लोखंडे जखमी झाली असून तिच्यावर कामोठ्यातील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, कामोठे सेक्टर-१०, प्लॉट क्रमांक ६१ येथील सहा मजली साई सिद्धी सोसायटीतील फ्लॅट क्रमांक १०१ मध्ये लोखंडे कुटुंब वास्तव्यास आहे. बुधवारी सकाळी सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास सुरेश लोखंडे आणि त्यांची मुलगी वेदिका बेडरूममध्ये झोपलेले असताना अचानक बेडरूमचा स्लॅब कोसळला.

Kamothe Slab Collapse Youth Death
Belapur Uran Panvel Traffic: अटल सेतू-गव्हाणफाटा मार्गावरील सततची वाहतूककोंडी फुटणार; वाहतुकीत बदल

स्लॅबचा मोठा भाग सुरेश लोखंडे यांच्या अंगावर व छातीवर पडल्याने ते गंभीर जखमी झाले. तसेच काही भाग मुलगी वेदिकाच्या अंगावर पडल्याने तिच्या हाताला दुखापत झाली. आवाज ऐकून सोसायटीतील रहिवासी घटनास्थळी धावले आणि दोघांना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र डॉक्टरांनी सुरेश लोखंडे यांना मृत घोषित केले.

या घटनेमुळे कामोठे परिसरात शोककळा पसरली आहे. कुटुंबातील कर्ता पुरुष गमावल्याने लोखंडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या दुर्घटनेनंतर इमारतीच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.

Kamothe Slab Collapse Youth Death
Panvel Schocking News |धक्कादायक : अंगणवाडीत जाण्यास चिमुरडीचा नकार, संतापलेल्या आईचा लाथाबुक्क्यांचा मारा!

सोसायटीतील इतर स्लॅबही धोकादायक? रहिवाशांचा सवाल

आज घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे. लोखंडे यांच्या फ्लॅटप्रमाणेच इतर काही फ्लॅटमधील स्लॅबदेखील धोकादायक स्थितीत असल्याचा दावा सोसायटीतील रहिवाशांनी केला आहे. त्यामुळे इमारतीची तातडीने संरचनात्मक तपासणी करण्याची मागणी रहिवाशांकडून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news