

मुंबई: मुंबई प्लास्टिकमुक्त करण्यासाठी महापालिकेने सुरू ठेवलेल्या मोहिमेत मोठी कारवाई करण्यात आली आहे. महापालिकेच्या विविध विभागांनी २३ जून २०१८ ते ३१ ऑगस्ट २०२६ या कालावधीत मुंबईतील दुकाने, आस्थापना आणि बाजारांमध्ये तब्बल २९ लाख २८,७३२ ठिकाणी धाडी टाकल्या.
या कारवाईदरम्यान १ लाख २२,११३ किलो (सुमारे १२२ टन) प्रतिबंधित प्लास्टिक जप्त करण्यात आले असून नियमभंग करणाऱ्यांकडून ९ कोटी ४० लाख ४० हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
महापालिकेच्या दुकाने व आस्थापना विभाग, अनुज्ञापन विभाग व बाजार विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ही मोहीम राबवण्यात आली. या कारवाईअंतर्गत एकूण १८,७६८ प्रकरणे दाखल करण्यात आली आहेत.
व्यापारी, व्यावसायिक व नागरिकांनी सिंगल यूज व प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर पूर्णपणे थांबवावा, अन्यथा यापुढील काळात कारवाई अधिक तीव्र केली जाईल, असा सक्त इशारा महापालिकेने दिला आहे.
दुकाने व आस्थापना विभागाने सर्वाधिक ९ लाख ५३,७३४ भेटी देऊन १ लाख १,२७८ किलो प्लास्टिक जप्त केले. या विभागाकडून १५,२४८ प्रकरणांत ७ कोटी ६४ लाख ४० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
अनुज्ञापन विभागाने ९ लाख ८५,६८२ ठिकाणी तपासणी करून १९,५५३ किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले. २,८२० प्रकरणांतून १ कोटी ४१ लाखांचा दंड वसूल केला.तर बाजार विभागाने ९ लाख ८९,३१६ बाजारांतील गाळ्यांना भेटी देऊन १,२८१ किलो प्लास्टिक जप्त करत ७०० प्रकरणांतून ३५ लाखांचा दंड वसूल केला.
दुकाने व आस्थापना विभागाने १ एप्रिल २०२५ ते ३१ जुलै २०२६ या १६ महिन्यांच्या काळात मुंबईतील २४ प्रभागांत (वॉर्ड) विशेष मोहीम राबवली. या कालावधीत १ लाख १५,८३० दुकाने व आस्थापनांची तपासणी करण्यात आली. यात ७,५०५ किलो प्लास्टिक जप्त करून १ कोटी ३० लाख ९५ हजारांचा दंड वसूल केला.
दुकाने व आस्थापना विभागाने १ एप्रिल २०२५ ते ३१ जुलै २०२६ या १६ महिन्यांच्या काळात मुंबईतील २४ प्रभागांत (वॉर्ड) विशेष मोहीम राबवली. या कालावधीत १ लाख १५,८३० दुकाने व आस्थापनांची तपासणी करण्यात आली.
यात ७,५०५ किलो प्लास्टिक जप्त करून १ कोटी ३० लाख ९५ हजारांचा दंड वसूल करण्यात आला. यात के-पश्चिम, के-पूर्व, एल आणि एम-पूर्व या वॉर्डांमध्ये सर्वाधिक जप्ती व कारवाईची नोंद झाली आह