Panvel Firecracker Rules: पनवेलमध्ये सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास मनाई; उच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करण्याचे आवाहन

ध्वनी-वायू प्रदूषण थांबवा; उच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करा -पनवेल मनपाचे आवाहन
Panvel Firecracker Rules
Panvel Firecracker RulesPudhari
Published on: 
Updated on: 

विक्रम बाबर

पनवेल: पनवेल महापालिकेने सार्वजनिक रस्ते, रस्त्यांच्या कडेला असलेली ठिकाणे, गल्ल्या, पदपथ आणि अन्य सार्वजनिक जागांवर फटाके फोडू नयेत. तसेच न्यायालये, रुग्णालये, शासकीय कार्यालये, शाळा आणि इतर शांतता क्षेत्रांमध्ये फटाके फोडण्याचे टाळावे. उच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करावे असे आवाहन मनपाने केले आहे.

सण-उत्सवांच्या काळात ध्वनी व वायू प्रदूषणाला आळा घालण्यासाठी सार्वजनिक रस्ते, पदपथ, गल्ल्या तसेच रुग्णालये, शाळा आणि अन्य शांतता क्षेत्रांच्या परिसरात फटाके फोडण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने Suo Motu PIL No. 01 of 2026 प्रकरणात दिलेल्या अंतरिम आदेशाच्या अनुषंगाने पनवेल महानगरपालिकेच्या पर्यावरण विभागाने नागरिकांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

सण-उत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरे करून न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे. महापालिकेने २३ ऑक्टोबर रोजी सूचना जारी केली आहे.

Panvel Firecracker Rules
Jogeshwari Trauma Hospital: जोगेश्वरी ट्रॉमा रुग्णालय पुन्हा चर्चेत! १५ दिवसांत तीन मृत्यू, उपचारांवर प्रश्नचिन्ह

सार्वजनिक कार्यक्रम, मिरवणुका किंवा अन्य कार्यक्रमांमध्ये ध्वनिवर्धक यंत्रणेचा वापर करण्यापूर्वी सक्षम प्राधिकरणाची परवानगी घेणे बंधनकारक आहे. परवानगी देताना घालून दिलेल्या अटींचे काटेकोर पालन करावे, असेही महापालिकेने स्पष्ट केले आहे.

फटाके आणि ध्वनिवर्धकांच्या अतिवापरामुळे ध्वनी प्रदूषण वाढून नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. फटाक्यांमुळे वायू प्रदूषणातही भर पडत असल्याने नागरिकांनी पर्यावरणाच्या दृष्टीने जबाबदारीने सण साजरे करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

Panvel Firecracker Rules
Mumbai Land Acquisition: विकासकामांसाठी भूसंपादन झाले, पण पुनर्विकासात अडथळे!

हरित फटाक्यांना प्राधान्य द्या

फटाक्यांचा वापर करताना तुलनेने कमी ध्वनी आणि कमी प्रदूषक उत्सर्जन करणाऱ्या हरित फटाक्यांना (ग्रीन क्रॅकर्स) प्राधान्य द्यावे, असे महापालिकेने सुचविले आहे. मात्र, हरित फटाके पूर्णपणे प्रदूषणमुक्त नसतात.

त्यामुळे त्यांच्या वापरावेळीही लागू असलेल्या नियमांचे आणि निर्धारित वेळेच्या मर्यादांचे पालन करणे आवश्यक आहे.

मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करून शांततापूर्ण, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक सण-उत्सव साजरे करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन उपायुक्त (पर्यावरण), पनवेल महानगरपालिका यांनी केले आहे.

ध्वनिवर्धकासाठी परवानगी आवश्यक

सार्वजनिक कार्यक्रम, मिरवणुका किंवा अन्य कार्यक्रमांमध्ये ध्वनिवर्धक यंत्रणेचा वापर करण्यापूर्वी सक्षम प्राधिकरणाची परवानगी घेणे बंधनकारक आहे. परवानगी देताना घालून दिलेल्या अटींचे काटेकोर पालन करावे, असेही महापालिकेने स्पष्ट केले आहे. फटाके आणि ध्वनिवर्धकांच्या अतिवापरामुळे ध्वनी प्रदूषण वाढून नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो, असे मनपा प्रशासनाने म्हटले आहे.

logo
Pudhari News
pudhari.news