Panvel eco friendly ganeshotsav : पनवेलमध्ये पर्यावरणपूरक गणेशोत्सवाकडे वाढता कल

शहरात आतापर्यंत शाडू मातीच्या सात हजार ७२६ मूर्तीचे विसर्जन; ४४ टन निर्माल्य संकलित
Panvel eco friendly ganeshotsav
Panvel eco friendly ganeshotsavpudhari photo
Published on
Updated on

खांदा कॉलनी : राजेश डांगळे

गणेशोत्सवाच्या कालावधीत पनवेल महानगरपालिका क्षेत्रात यंदा तब्बल २६ हजार ८८ गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात आले. दीड दिवस, पाच दिवस, गौरी-गणपती तसेच सात दिवसांच्या गणेशमूर्तीचा यात समावेश आहे. येथील गणेशोत्सवाची वाटचाल ही पर्यावरण संवर्धनाकडे दिसून आहे. शहरात आतापर्यंत सात हजार ७२६ शाडू मातीच्या मूर्तीचे विसर्जन झाले आहे.

महापालिकेच्या विसर्जन अहवा-लातून यंदाच्या गणेशोत्सवातील मूर्ती विसर्जनाची संपूर्ण आकडेवारी समोर आली आहे. यामध्ये शाडू मातीच्या सात हजार ७२६ मूर्ती, तर प्लास्टर ऑफ पॅरिसच्या १८ हजार ३६२ मूर्तीचे विसर्जन झाले.

Panvel eco friendly ganeshotsav
Mahad News : महाड झाले कमानींचे शहर; पण प्रबोधनाचा संदेश हरवला

शाडू मातीच्या मूर्तीपैकी ५ हजार १९३ मूर्तीचे नैसर्गिक तलावांमध्ये, तर २ हजार ५३३ मूर्तीचे कृत्रिम तलावांमध्ये विसर्जन करण्यात आले. पीओपीच्या १४ हजार ७१० मूर्ती नैसर्गिक तलावांमध्ये, तर ३ हजार ६५२ मूर्ती कृत्रिम तलावांमध्ये विसर्जित करण्यात आल्या.

गणेशभक्तांची गर्दी लक्षात घेऊन महापालिकेने शहरातील विविध नैसर्गिक तसेच कृत्रिम विसर्जनस्थ ळांवर व्यवस्था केली होती. विसर्जन प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी अधिकारी, कर्मचारी आणि स्वयंसेवक तैनात करण्यात आले होते.

यंदाच्या गणेशोत्सवात निर्माल्य संकलनावरही विशेष भर देण्यात आला. महापालिका क्षेत्रात तब्बल ४४.३ टन निर्माल्य संकलित करण्यात आले. यामध्ये फुले, हार तसेच अन्य पूजासाहित्याचा समावेश होता. नानासाहेब धर्माधिकारी संस्थेच्या माध्यमातूनही ९.५ टन निर्माल्य संकलित करण्यात आले. नागरिकांनी निर्माल्य थेट तलावात न टाकता उपलब्ध करून देण्यात आलेल्या संकलन केंद्रांमध्ये जमा केले. त्यामुळे जलस्रोतांमध्ये निर्माल्य जाण्याचे प्रमाण कमी करण्यास मदत झाली.

दरम्यान, एकूण विसर्जित मूर्तीच्या तुलनेत शाडूच्या मूर्तीची संख्या लक्षणीय असल्याचे आकडेवा-रीतून दिसून येत आहे. पर्यावरणपूरक गणेशमूर्तीकडे नागरिकांचा वाढता कल असल्याचे यामुळे स्पष्ट होत आहे.

Panvel eco friendly ganeshotsav
Raigad News : उरण तालुक्यात मलेरिया, डेंग्यूचा प्रकोप

मात्र, पीओपीच्या मूर्तीची संख्या अद्यापही मोठी असल्याने आगामी गणेशोत्सवात पर्यावरणपूरक मूर्तीच्या वापराबाबत जनजागृती करण्याचे आव्हान कायम आहे. विसर्जनानंतर महापालिकेच्या माध्यमातून विविध विसर्जनस्थळांवर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. नागरिकांच्या सहकार्यामुळे यंदाची विसर्जन प्रक्रिया नियोजनबद्ध पद्धतीने पार पडली. आरोग्य निरीक्षक अरुण कांबळे आणि त्याच्या सहकारी फार मोठी मेहनत घेतली.

  • शाडूच्या ५ हजार १९३ मूर्तीचे नैसर्गिक तलावांमध्ये, तर २ हजार ५३३ मूर्तीचे कृत्रिम तलावांमध्ये तर पीओपीच्या १४ हजार ७१० मूर्ती नैसर्गिक तलावांमध्ये, तर ३ हजार ६५२ मूर्ती कृत्रिम तलावांमध्ये विसर्जित करण्यात आल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news