

पनवेल : ‘माझी वसुंधरा अभियान 3.0’ मध्ये राज्यस्तरीय तृतीय क्रमांक मिळाल्यानंतर प्राप्त झालेल्या पारितोषिक रकमेचा लोकहितार्थ परिणामकारक वापर करत पनवेल महानगरपालिकेने शहरात पाच ठिकाणी नाविन्यपूर्ण ‘सोलार ट्री’ प्रकल्प पूर्ण केला आहे. आयुक्त तथा प्रशासक मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या पर्यावरणपूरक उपक्रमामुळे स्वच्छ ऊर्जा निर्मिती, ऊर्जासंकल्पना, तसेच पर्यावरण जनजागृतीला मोठी चालना मिळाली आहे.
महानगरपालिकेच्या डीपीआरमध्ये प्रस्तावित असलेल्या या प्रकल्पांतर्गत विविध प्रभागांतील उद्यानांमध्ये आधुनिक आणि आकर्षक सौर-ट्रींची उभारणी करण्यात आली असून, सार्वजनिक ठिकाणी अक्षय ऊर्जेच्या वापराला प्रोत्साहन देणारा हा उपक्रम नागरिकांच्या लक्ष वेधून घेत आहे.
4 फॉग कॅनन वाहने धूळ नियंत्रणासाठी शहरभर नियमित फवारणी एअर मॉनिटरिंग व्हॅन शहरातील विविध भागांतील सतत मोजणी 5 एअर प्युरिफिकेशन सिस्टीम्स महत्त्वाच्या ठिकाणी कार्यरत लवकरच अजून 5 ठिकाणी एअर प्युरिफिकेशन सिस्टीम बसविण्याची योजना या सर्व उपक्रमांमुळे पनवेलमध्ये स्वच्छ, निरोगी आणि पर्यावरणपूरक वातावरण निर्मितीची दिशा मजबूत होत असून, शहराचा शाश्वत विकास अधिक वेगाने पुढे जात आहे.
स्थापित सोलार ट्रींची ठिकाणे
1 ‘अ’ प्रभाग खारघर : सेक्टर 20, प्लॉट 21
2 नावडे उपविभाग (तळोजा) : सेक्टर 14, प्लॉट 92
3 ‘ब’ प्रभाग कळंबोली : सेक्टर 6, प्लॉट 2
4 ‘क’ प्रभाग कामोठे : सेक्टर 5, प्लॉट 45
5 ‘ड’ प्रभाग पनवेल : नवीन पनवेल, सेक्टर 16, प्लॉट 3
पर्यावरण विभागाची चमकदार कामगिरी
पनवेल महानगरपालिका शहरातील वाढत्या वायूप्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी सातत्याने प्रभावी उपाययोजना राबवत आहे. धूळ नियंत्रण, हवेची गुणवत्ता सुधारणा आणि तांत्रिक साधनांच्या माध्यमातून स्वच्छ वातावरण निर्माण करण्यासाठी महानगरपालिका कटिबद्ध आहे.
सोलार ट्री प्रकल्पामुळे शहरातील हरित ऊर्जा उपक्रमांना गती मिळाली असून पुढील काळात अशाच आणखी पर्यावरणपूरक प्रकल्प राबविण्याचा मानस आहे.
स्वरूप खारगे, उपायुक्त