Online Fertilizer Booking: शेतकऱ्यांना मोबाईल ॲपवरून खरेदी करता येणार खत

खतांचा साठा उपलब्ध आहे की नाही, याची खातरजमा करण्यासाठी शेतकऱ्यांना यापूर्वी विविध कृषी केंद्रांवर वारंवार जावे लागत होते.
Maharashtra Farmer
Maharashtra FarmerPudhari
Published on
Updated on

अलिबाग: जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रासायनिक खतांची उपलब्धता, ऑनलाइन बुकिंग आणि वितरण प्रक्रिया अधिक सुलभ, पारदर्शक आणि शेतकरीहिताची करण्यासाठी कृषि विभागाकडून 'फ्रेमवर्क फॉर फर्टीलायझर सेल' ही ऑनलाइन खत विक्री प्रणाली १५ ऑगस्टपासून कार्यान्वित करण्यात आली आहे.

खतांचा साठा उपलब्ध आहे की नाही, याची खातरजमा करण्यासाठी शेतकऱ्यांना यापूर्वी विविध कृषी केंद्रांवर वारंवार जावे लागत होते.

Maharashtra Farmer
Raigad Industrial Gas Leak Accidents: रायगड जिल्ह्यात रासायनीक वायू गळतीच्या घटनांमध्ये वाढ; सहा वर्षांत ३५ मृत्यू तर १५० बाधीत

त्यामुळे त्यांचा वेळ आणि खर्च वाया जात होता. नवीन प्रणालीमुळे शेतकऱ्यांना आपल्या मोबाईलवरूनच आवश्यक खतांची उपलब्धता तपासून जवळच्या कृषी केंद्रातील विक्रेत्याकडे खताचे बुकिंग करता येणार आहे. यामध्ये युरिया, डीएपी, सुफला तसेच इतर अनुदानित खतांचा समावेश आहे.

शेतकऱ्यांनी मोबाईलवर 'फ्रेमवर्क फॉर फर्टीलायझर सेल' हे ॲप्लिकेशन डाउनलोड करावे. स्मार्टफोनची सुविधा नसलेल्या शेतकऱ्यांना जवळच्या सीएससीकेंद्र, पीएसीएस, अधिकृत खत विक्रेता किंवा एफपीओ यांच्या माध्यमातूनही बुकिंग करता येणार आहे.

बुकिंगसाठी शेतकरी आयडी, आधार क्रमांक तसेच जमीन व पिकांची आवश्यक माहिती उपलब्ध असणे गरजेचे आहे. अॅपमध्ये शेतकरी आयडी किंवा आधार क्रमांकाद्वारे लॉगिन करून आवश्यक खताची निवड करता येईल. निवडलेल्या जवळच्या कृषी केंद्रावर उपलब्ध साठ्यानुसार बुकिंग केल्यानंतर शेतकऱ्याला क्युआर कोड अथवा टोकन क्रमांक मिळेल. हा क्युआर कोड किंवा टोकन क्रमांक घेऊन संबंधित कृषी केंद्रावर जाऊन खताची खरेदी करता येणार आहे.

Maharashtra Farmer
Mumbai Goa Highway: कोकणचा प्रवास यावर्षीही खड्ड्यातूनच; मुंबई-गोवा महामार्गावर २० ठिकाणे आजही धोकादायक स्थितीत

बुकिंगनंतर मिळालेला क्युआर कोड अथवा टोकन क्रमांक दोन दिवसांसाठी वैध राहणार आहे. या कालावधीत खताची खरेदी न झाल्यास पुन्हा बुकिंग करता येणार आहे. शेतकऱ्याला स्वतः खत घेण्यासाठी उपस्थित राहता येत नसल्यास, त्याच्या वतीने अधिकृत प्रतिनिधीलाही खत घेता येणार आहे.

जिल्ह्यात खतांची उपलब्धता कायम राहावी आणि कोणत्याही भागात खताची कमतरता भासू नये, यासाठी कृषि विभागाने नियोजन केले आहे. नवीन प्रणाली प्रभावीपणे राबविण्यासाठी जिल्हास्तरीय व क्षेत्रीय अधिकारी-कर्मचारी तसेच खत विक्रेत्यांचे प्रशिक्षणही घेण्यात येत आहे.

डिजिटल प्रणालीचा लाभ घेण्याचे आवाहन

ऑनलाइन बुकिंग, खताची उपलब्धता किंवा वितरण प्रक्रियेत कोणतीही अडचण आल्यास शेतकऱ्यांनी संबंधित तालुका कृषि अधिकारी, गुणनियंत्रण निरीक्षक किंवा पंचायत समितीच्या कृषि विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषि विभागाने केले आहे. रायगड जिल्ह्यात या डिजिटल प्रणालीचा शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा आणि खताची उपलब्धता तपासून ऑनलाइन बुकिंगद्वारे सुलभपणे खरेदी करावी, असे आवाहन जिल्हा कृषि विभागाकडून करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news